Jairam Ramesh sakal
देश

Jairam Ramesh : अग्निवीर योजनेबद्दल पंतप्रधानांकडून दिशाभूल : काँग्रेस

अग्निवीर योजना भारतीय लष्कराची असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा खोटा असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अग्निवीर योजना भारतीय लष्कराची असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा खोटा असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी आज कारगिल येथील युद्ध स्मारकावर जाऊन अभिवादन केले आहे. यावेळी ‘अग्निवीर योजना भारतीय लष्कराने तयार केली होती,’ असा दावा त्यांनी केला. यावर काँग्रेसचे सरचिटणीस खासदार जयराम रमेश यांनी आक्षेप घेतला आहे.

‘अग्निवीर योजना ही पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) तयार केली होती. या योजनेबद्दल भारतीय लष्कराला काहीही माहिती नव्हती. तत्कालीन लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात या योजनेबद्दल लष्कराला काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही योजना भारतीय लष्करासाठी धक्का होता, असेही त्यांनी नमूद केले आहे. ही वस्तुस्थिती असताना पंतप्रधान मोदी मात्र या योजनेचे खापर आता लष्करावर फोडत आहे,’’ असे रमेश म्हणाले.

निवृत्त होणाऱ्या जवानांना निवृत्तिवेतन देण्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी अग्निवीर योजना लागू करण्यात आल्याच्या आरोपाचा मोदी यांनी इन्कार केला आहे. परंतु दोन वर्षांपासून निवृत्त अधिकारी, संरक्षण दलाचे तज्ज्ञ मात्र यासाठीच ही योजना लागू केल्याचा आरोप करत आहेत. परंतु स्वतःला ईश्वराचे अवतार समजणारे पंतप्रधान मात्र या जबाबदारीतून मुक्त होऊ इच्छित आहे, ही आश्चर्याची बाब असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! उद्यापासून १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल फेऱ्या

अखेर जेठालाल- बबिताचं लग्न झालं! दयाबेनने वाढलं जेवण; दिग्दर्शकाला नाही जमलं ते AI ने करून दाखवलं; व्हिडिओ होतोय व्हायरल

Service Medals: वीरता-सेवा पदकांची घोषणा! CRPF ला सर्वाधिक पदकं; देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचा सन्मान

Career Horoscope: ‘या’ राशींचे लोक असतात प्रचंड मेहनती; पण नशिबाची साथ कमी, दरवेळी हातातोंडाशी आलेलं यश हुकतं

Tukaram Mundhe: मोठी बातमी! पुण्यातील प्रसिद्ध 'बर्गर किंग'वर FDAची कारवाई; 'झेप्टो'लाही तुकाराम मुंढेंचा दणका

SCROLL FOR NEXT