class 9th 10th and 11th performance may include in class 12th report card parakh report  
देश

फक्त १२वीत अभ्यास करून भागणार नाही! ९वी, १०वी अन् ११ वीच्या गुणांवर ठरणार निकाल; NCERTच्या रिपोर्टमध्ये आला नवा फॉर्म्युला

Class 12th Report Card : यामध्ये ९वी, १०वी आणि ११वीचे गुण हे १२वीच्या निकालामध्ये देण्यात यावेत अशी शिफारस करण्यात आली आहे, तसेच याच आधारावर १२वीचा निकाल तयार केला जावा असेही सुचवण्यात आले आहे.

रोहित कणसे

येत्या काही दिवसात १२वीच्या निकालात ९वी, १०वी आणि ११वीचे गुण देखील महत्वाची भूमीका बजावू शकतात. NCERT चे युनिट PARAKH ने तयार केलेल्या एका रिपोर्टमध्ये यांसंबधीची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये ९वी, १०वी आणि ११वीचे गुण हे १२वीच्या निकालामध्ये देण्यात यावेत अशी शिफारस करण्यात आली आहे, तसेच याच आधारावर १२वीचा निकाल तयार केला जावा असेही सुचवण्यात आले आहे.

एक्स्प्रेसने दिलेल्या रिपोर्टनुसार, शिक्षण मंत्रालयाला ही रिपोर्ट सुपूर्द करण्यात आली आहे. यामध्ये ९, १० आणि ११ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारावर १२ वीचा निकाल तयार केला पाहिजे. जर या तीन वर्गात विद्यार्थी चांगले गुण मिळवले आणि ते वर्गात नियमीत असतील तर त्यांना याचा फायदा १२वीच्या निकालामध्ये मिळाला पहिजे. NCERT चे यूनिट परखने याबद्दलची शिफारस केली आहे. परखची स्थापना मागिल वर्षी करण्यात आली होती.

रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

PARAKH च्या रिपोर्टमध्ये शिफारस करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांच्या ९वी, १०वी आणि ११वीच्या वर्गातील कामगिरीच्या आधारावर त्यांचा १२वीचा निकाल जाहीर केला पाहिजे. १२वीच्या निकालात ९वी चे १५ टक्के, १० वीचे २० टक्के आणि ११वीचे २५ टक्के व्हेटेज देण्यात यावे असेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

यासोबतच १२वीच्या गुणपत्रिकेत संयुक्त मुल्यांकन फॉर्मेटिव्ह असेसमेंट (होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, ग्रुप डिस्कशन, प्रोजेक्ट) आणि समेटिव्ह असेसमेंट (टर्म एक्झाम) यांना देखील व्हेटेज असेल.

मीडिया रिपोर्टनुसार, हा रिपोर्ट शिक्षण मंत्रालय सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांसोबत चर्चेला ठेवणार आहे. जेणेकरून सर्व आपलं म्हणणं मांडू शकतील, तसेच सर्वांची सहमती मिळाल्यानंतर हा रिपोर्ट लागू केला जाईल. एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार या शिफारसीबद्दल मागील एक वर्षात ३२ शालेय मंडळांसोत चर्चा करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT