देश

OROP: 'वन रँक, वन पेन्शन'वर आता 'सुप्रीम' तोडगा! थकबाकी देण्यासाठी कोर्टाची डेडलाईन

कौटुंबिक पेन्शन, वीरता पुरस्कारप्राप्त, ७० वर्षांवरील माजीसैनिक आणि इतरांसाठी 'या' तारखांपर्यंत मिळणार पेन्शन.

सकाळ डिजिटल टीम

OROP arrears case: वन रँक, वन पेन्शन संदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टानं केंद्राचा बंद लिफाफ्यातील अहवाल नाकारला. पण माजी सैनिकांच्या या पेन्शनबाबत नवा फॉर्म्युला निश्चित केला तसेच कधीपर्यंत ही थकीत पेन्शन दिली जावी याची डेडलाईनही दिली आहे. (Clear all OROP dues by Feb 28 2024 Supreme Court directs Centre)

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, योग्य कौटुंबिक पेन्शनधारकांना ३० एप्रिल २०२३ पर्यंत, सशस्त्र दलांतील वीरता पुरस्कारप्राप्त जवानांना ३० जून २०२३ पर्यंत तर ७० वर्षांहून अधिक वय असलेल्या पेन्शनधारकांना ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत पेन्शन देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय इतर पेन्शनधरकांना समान हप्त्यांमध्ये २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत थकीत पेन्शन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिले आहेत.

हे ही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

चार हप्त्यांमधील थकबाकीचा आदेश परत घेण्याचे निर्देश

यापूर्वी १३ मार्च रोजी सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं संरक्षण मंत्रालयाला २० जानेवारीच्या त्या आदेशाला तत्काळ प्रभावानं मागे घेण्याचे आदेश दिले होते. ज्यामध्ये चार हप्त्यांमध्ये वन रँक, वन पेन्शन (OROP) देण्यात येईल असं म्हटलं होतं. यावर कोर्टानं टिप्पणी केली की, संरक्षण मंत्रालय कायदा आपल्या हातात घेऊ शकत नाही. त्यावर कोर्टानं कोर्टाला सांगितलं की, सरकारनं माजी सैनिकांना थकीत पेन्शन एकाच हप्त्यात दिली आहे. पण पूर्णपणे थकबाकी द्यायला अधिक काळ लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Relief: केशरी रेशनकार्ड धारकांसाठी सरकारने घतला मोठा निर्णय; ३ महिने मिळणार मोफत धान्य

26/11 Mumbai Attacks: मृत्यू समोर दिसत होता, पण माईक हातातून सोडला नाही! २६/११ च्या रात्री रेल्वे अनाउंसर बनला शेकडो प्रवाशांचा आधार

Shivaji University Convocation : शेतकऱ्याच्या लेकीची उत्तुंग भरारी! राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या तनुजाचे पुढचे ध्येय वाचून तुम्हीही कराल कौतुक; वेदिकानही केलं वडिलांचं स्वप्न पूर्ण

India WTC Final Qualification Scenarios: टीम इंडियाची झोप उडाली... IND vs NZ दुसरी कसोटी अनिर्णित किंवा पराभूत झाल्यास काय? WTC Final साठी कसं असेल समीकरण?

Pune Solapur Highway Accident: देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; पुणे-सोलापूर महामार्गावर उभ्या ट्रकला कारची धडक, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT