दिल्ली : देशातील बहुतेक राज्यांमध्ये मॉन्सूनने जोर पकडला आहे. मात्र अनेक ठिकाणी पावसामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. हिमाचल प्रदेशात गुरुवारी सकाळी ढगफुटी होऊन दोन जणांचा मृत्यू झाला तर ५० लोक बेपत्ता आहेत. राजस्थानमध्येही पावसाचे पाणी इमारतीच्या तळघरात साचून अल्पवयीन मुलीसह तीन जणांचा मृत्यू झाला. राजधानी दिल्लीत काल सायंकाळपासून पावसाने कहर केला आहे. पावसामुळे आतापर्यंत दहा जणांचा बळी गेला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये कुलू आणि मंडी जिल्ह्यात आज पहाटे चार वाजता ढगफुटी झाली. कुलूतील सिमला जिल्ह्यात रामपूरमधील समघ खुड (नाला) एका वीज प्रकल्पातील लोक बेपत्ता झाले आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. २० पेक्षा जास्त घरे जमीनदोस्त झाली, गाड्या वाहून गेल्या तर काही शाळांमध्ये पुराचे पाणी घुसले. मंडी जिल्ह्यात ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह सापडला आहे. काहीजण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. मलाणात पार्वती नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने जलविद्युत प्रकल्पाचे धरण फुटले.
मनालीतील मणिकर्न रस्त्यावर भाजी मंडईची पाच मजली इमारत ढासळली. कुलूतील जिल्हाधिकारी तोरूल एस.रवीश यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना आज आणि उद्या (शुक्रवारी) सुट्टी देण्यात आली आहे.
अन्य राज्यांतही हानी
उत्तराखंडमध्ये टिहरी गढवालमधील घनसालीत काल रात्री ढगफुटी झाली. तेथे दोन जणांचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला. केदारनाथमध्ये ढगफुटीने यात्रा मार्गावरील ३० मीटरचा रस्ता मंदाकिनी नदीत वाहून गेला. यामुळे यात्रा थांबविण्यात आली असून २०० जण अडकले आहेत.
हरियानातील यमुनानगरमध्ये मंडेबर गावाजवळ पंचकुला - हरिद्वार राष्ट्रीय महामार्ग खचला. तेथून जाणारा एक ट्रक खड्ड्यात गेला. अपघातात चालकाचा जीव वाचला आहे.
गुरुग्राममध्ये पावसामुळे झाड पडल्याने उच्च वीज वाहिनी पाण्यात पडली. त्यावेळी तेथून जाणाऱ्या तिघांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला.
बिहारमधील गेल्या २४ तासांत जेहानाबाद जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने तीन जणांचा व रोहतास जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
राजस्थानमधील जयपूरमध्ये विश्वकर्मा भागातील घराच्या तळघरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले होते. त्यात एका अल्पवयीन मुलीसह तिघांचा मृत्यू झाला.अनेक तास चाललेल्या बचाव कार्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.