Delhi-Pollution 
देश

प्रदूषणाचे ढग दिल्लीत पुन्हा गडद

पीटीआय

नवी दिल्ली - दिल्लीलगतच्या राज्यांमध्ये कचरा जाळण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे सावट नवी दिल्लीच्या हवेवर दिसून येत आहे. परिणामी हवेतील शुद्धतेचे प्रमाण पुन्हा एकदा घसरत चालले आहे. हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकांच्या आधारावर दिल्लीतील हवेने एक्‍यूआय २४५ अंशांच्या पातळीला स्पर्श केला आहे. ही श्रेणी खराब मानली जाते. 

हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानुसार ० ते ५० यादरम्यानचा निर्देशांक चांगल्या दर्जामध्ये मोडतो. ५१ ते १०० दरम्यानचा समाधानकारक, १०१ ते २०० दरम्यानची पातळी मध्यम आणि २०१ ते ३०० दरम्यान निकृष्ट आणि ३०१ ते ४०० अतिनिकृष्ट मानली जाते. दिल्लीतील लोधी रोड भागातील हवेच्या गुणवत्तेच्या पातळीचा निर्देशांक २०१ नोंदला गेला आहे. या भागातील हवेत दाट धुके दिसून आल्याने दृष्यमानता खूपच कमी झाली आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी शेजारील राज्यांत जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे दिल्लीचे वातावरण बिघडत असल्याचे म्हटले होते. विशेषत: हरियानातील कर्नाल येथे कचरा जाळल्यानेच दिल्लीत वातावरण खराब होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यादरम्यान दिल्लीत १५ ऑक्‍टोबरपासून हवेतील प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी व्यापक मोहीम दिल्ली सरकारने हाती घेतली आहे. त्यात वीटभट्ट्यांवर बंदी, बांधकामास स्थगिती, बाहेरगावाहून येणाऱ्या ट्रकला प्रवेशास मनाई आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT