amrindar singh
amrindar singh 
देश

Amritsar Rail Accident : 'रेल्वे अपघाताची 4 आठवड्यात चौकशी करणार'

वृत्तसंस्था

अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी अमृतसर रेल्वे अपघातातील जखमींची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या अपघाताची चौकशी करून चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांसाठी 5 लाख व जखमींना मोफत उपचार देणार असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.  

काल रावणदहनाच्या कार्यक्रमावेळी जलंधर-अमृतसर रेल्वेने रेल्वे रूळावर उभ्या असलेल्या लोकांना चिरडले. या भीषण अपघातात 61 लोकांचा मृत्यू झाला, तर 72 जण जखमी झाले आहेत. या अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात असल्याची माहिती सिंग यांनी दिली. तसेच पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी केली जाईल व अहवाल सादर केला जाईल असेही त्यांनी सांगितले. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन होईल, 9 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही, अशीही माहिती सिंग यांनी दिली.

अमरिंदर सिंग यांनी अमृतसरमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली. तिथे त्यांना चांगले व मोफत उपचार मिळतील अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. 'ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून ही वेळ आरोप प्रत्यारोपाची नाही' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT