Swati Maliwal Assault esakal
देश

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Swati Maliwal Assault: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अजूनही मौन बाळगून आहेत, त्यांच्या पीएविरोधात त्यांनी एक शब्दही उच्चारला नसल्याने या प्रकरणातील वाद वाढला आहे.

Sandip Kapde

Swati Maliwal Assault: 

राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) आम आदमी पार्टीच्या (AAP) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याची स्वतःहून दखल घेतली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वातीला मारहाण करणाऱ्या बिभव कुमारला पुन्हा नोटीस पाठवण्यात आल्याचं एनसीडब्ल्यूच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी म्हटलं आहे. त्यांनी या नोटीसला उत्तर न दिल्यास त्यांची टीम आता त्यांच्या निवासस्थानी जाणार आहे. आपण स्वातीलाही भेटणार असल्याचे तिने सांगितले आहे.

राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या,  बारकाईने या प्रकरणाकडे पाहत होतो. आमच्यात मतभेद होते पण आम्ही नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो. स्वाती बोलू शकते असे वाटल्यावर त्यांनी काल तक्रार दिली आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला. कारवाईचा अहवाल तयार केला आहे. मी स्वाती सोबत स्वतः बोलेल... स्वातीवर मानसिक आणि शारीरिक आघात झाला आहे.

पोलिस बिभव कुमारला शोधत आहेत. आम्ही उद्या पर्यंत वाट पाहू... उद्या जर बिभव स्वतः आला नाही तर आम्ही त्याच्या घरी जाऊन चौकशी करू. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना माहीत होत काय होत आहे.  मात्र त्यांना त्याच काहीही पडलेल नाही... मुख्यमंत्री महिलांसोबत नाहीत. त्यांनी (केजरीवाल) यांनी स्वतः बाजू ठरवली आहे... ते (केजरीवाल) बिभवच्या बाजूने आहेत, असे रेखा शर्मा म्हणाल्या. 

मी स्वतः स्वाती मालीवाल यांच्या सोबत उभी आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांची पत्नी यांची देखील चौकशी केली जाईल, असे रेखा शर्मा यांनी सांगितले. 

दरम्यान स्वाती मालीवाल आज तीस हजारी न्यायालयात पोहोचली, प्राणघातक हल्ला प्रकरणी जबाब नोंदवला जाणार आहे. अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बिभवविरोधात एफआयआर नोंदवला आहे. त्या एफआयआरमध्ये बिभववर मारहाणीपासून शिवीगाळ करण्यापर्यंत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आता तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बिभवचा शोध घेण्यासाठी 10 पथके तयार केली आहेत.

भाजपवाल्यांनी राजकारण करू नये - स्वाती मालीवाल

माझ्यासोबत जे घडलं ते खूप वाईट होतं. माझ्यासोबत घडलेल्या घटनेबाबत मी माझे म्हणणे पोलिसांना दिले आहे. मला आशा आहे की योग्य ती कारवाई केली जाईल. गेलेले दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले. ज्यांनी प्रार्थना केली त्यांचे मी आभार मानतो. ज्यांनी चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ते दुसऱ्या पक्षाच्या सांगण्यावरून करत असल्याचे सांगितले, देव त्यांचेही भले करो. देशात महत्त्वाच्या निवडणुका सुरू आहेत, स्वाती मालीवाल महत्त्वाच्या नाहीत, देशाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. भाजपवाल्यांना विशेष विनंती आहे की या घटनेवर राजकारण करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT