ashok gahlot 
देश

CM Ashok Gahlot:निवडणुका येताच अशोक गेहलोत यांना जातीची आठवण; म्हणाले, आमची जात...

विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी जातीचा उल्लेख? राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोतांवर होतायेत आरोप

सकाळ डिजिटल टीम

CM Ashok Gahlot: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना विधानसभा निवडणूकीच्या आधी पुन्हा एकदा त्यांची जात आठवली आहे. मुख्यमंत्री गहलोत म्हणाले की माझ्या माळी समाजातून राज्यात एकचं आमदार आहे, तो देखील मीचं आहे. राजस्थानमध्ये विजय मिळवणं खुप महत्वाचं आहे. याने फक्त राजस्थानमध्ये सत्ता नाही मिळणार, तर देशभरात संदेश जाईल.

कॉंग्रेसचं भविष्य राजस्थानवर अवलंबून असणार आहे. कॉंग्रेस पक्ष बळकट होणं देशासाठी चांगलं आहे. देशात प्रत्येक गावात कॉंग्रेसचं अस्तित्व आहे. दाक्षिणात्य राज्य आणि उत्तर-पुर्व राज्यांमध्ये भाजपचं वर्चस्व स्पष्ट आहे.

जकीय विश्लेषकांचा तर्क आहे की, अशोक गहलोत निवडणूकीच्या आधी आपल्या जातीबद्दल 'कास्ट कार्ड'खेळलं आहे. मुख्यमंत्री गहलोत माळी समाजाचे आहेत. गहलोत यांच्या जातीचे १० ते १५ हजार लोकं राजस्थानच्या पूर्व भागातील प्रत्येक मतदार संघात आढळतात. अलवार, सीकर, भरतपुर, दौसा आणि जयपुरच्या जवळच्या भागातील माळी समाज विजयासाठी खुप महत्वाचा आहे.

राजकीय विश्लेषकांचा दावा आहे की , अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद वाढल्याने जातीय समीकरणं फार महत्वाची ठरतील.सोशल मीडिया आणि गावातल्या प्रत्येक ठिकाणी गुर्जर समाजाकडून सचिन पायलट मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. राजकीय विश्लेषकांचा दावा आहे की मुख्यमंत्री गहलोत आधी आपल्या जातीचा उल्लेख करत नव्हते. (Latest Marathi news)

मात्र, आता हा उल्लेख प्रत्येकवेळी केल्याचा दिसतोय. असं मानलं जातं की माळी समाज भाजपला मतदान करतो, पण गहलोत यांच्याकडून वारंवार आपल्या जातीचा उल्लेख करुन माळी समाजाची वोट बॅंक आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न होतोय. गहलोत हे इतर मागास वर्गातील नेते आहेत. राजस्थानमध्ये इतर मागास वर्गाची लोकसंख्या ५० टक्क्यापेक्षा जास्त आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की चौथ्यांदा मुख्यमंत्री बनेल की नाही, याचा निर्णय पार्टी हाय कमांड घेईल. गहलोत वकीलांच्या एका कार्यक्रमात म्हणाले की,"मी बऱ्याचवेळा बोललोय की मुख्यमंत्रीपद सोडून देईल, पण मुख्यमंत्रीपद मला सोडत नाहीये. पूर्ण राज्य मला सहन करतय. यापेक्षा जास्त प्रेम काय असणार आहे."(Latest Marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT