CM on Traffic
CM on Traffic Esakal
देश

CM on Traffic: मुख्यमंत्र्यांचा नवा पॅटर्न; सामान्य माणसाप्रमाणे रेड सिग्नलला थांबवणार गाडी; निर्णयाचे कारण काय?

अंकिता खाणे (Ankita Khane)

CM on Traffic: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा सिग्नलवर थांबलेला पाहून लोकांना आश्चर्य वाटले. मुख्यमंत्र्यांची गाडीही रेड सिग्नलवर थांबली यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. सीएम भजनलाल शर्मा यांनी सामान्य माणसाप्रमाणे रस्त्यावर प्रवास निर्णय घेतला आहे. त्यांचा ताफा आता सामान्य माणसाप्रमाणे रेड सिग्नलवर थांबणार आहे. सीएम शर्मा यांनी बुधवारी सकाळी पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या, आता त्यांच्या सूचनांचे पालन सुरू झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून हे केले जात आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आता सामान्य माणसाप्रमाणे ट्रॅफिकमध्ये फिरतील आणि सिग्नल लाल झाला की थांबतील. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी व्हीआयपींच्या येण्याजाण्यामुळे वारंवार होणाऱ्या ट्रॅफिक जामपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आणि ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णांना या त्रासातून वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

डीजीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीएम भजनलाल शर्मा यांनी बुधवारी दुपारी राजस्थानचे पोलीस महासंचालक यूआर साहू (डीजीपी) यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि सांगितले की त्यांच्या ताफ्यामुळे वाहतूक थांबवू नये. शहरात फिरताना त्यांच्या ताफ्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लोक दीर्घकाळ वाहतूक कोंडीत अडकतात. अनेकवेळा ट्रॅफिक जाममध्ये रुग्णवाहिका अडकल्याच्या बातम्या येतात. अशा परिस्थितीत योजना तयार करून त्याची अंमलबजावणी व्हायला हवी.

चर्चा करून नियोजन केले जाईल

डीजीपी यूआर साहू म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांबाबत जयपूर पोलीस आयुक्तांना माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबाबत जयपूरचे पोलीस आयुक्त आणि गुप्तचर विभागाचे एडीजी यांच्याशी चर्चा करून योजना तयार केली जाईल. त्यांचा प्रयत्न सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा असेल तर त्यावर काम केले जाईल.

मुख्यमंत्र्यांनी बुधवारी राजस्थानचे पोलीस महासंचालक यू.आर.साहू यांना या निर्णयाबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना दिलेले सुरक्षा कवच तसेस राहणार आहे.

पोलिस महासंचालक यू.आर. साहू म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा कवचात कोणताही बदल होणार नाही. व्हीआयपींच्या ये-जा करताना सर्वसामान्य नागरिकांना आणि रुग्णांना होणारी वाहतूक समस्या लक्षात घेऊन नव्या व्यवस्थेचा निर्णय घेण्यात आला आहे.

बुधवारी रात्री सीएम भजनलाल शर्मा हे कुठेतरी जात होते, या दरम्यान त्यांची गाडी ओटीएस सर्कलच्या रेड सिग्नलवर सर्वसामान्यांप्रमाणे थांबली होती. मात्र, त्यांच्या गाडीभोवती सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे लाल सिग्नलवर उभे असलेले पाहून लोकांनाही आश्चर्य वाटले. यावेळी काही लोक मुख्यमंत्री शर्मा यांचे फोटो काढतानाही दिसले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT