Charanjit Singh Channi
Charanjit Singh Channi Sakal
देश

"पंजाबमध्ये जनतेचे सरकार स्थापन होईल" : चरणजीत सिंह चन्नी

सकाळ डिजिटल टीम

पंजाब: पंजाबमध्ये यंदा आम आदमी पार्टीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्या नंतर काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. काँग्रेसकडून नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) आणि चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Channi)या दोघांची नावे समोर आली. यापैकी कोणाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करणार याची चर्चा सुरु होती. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लुधियाणा प्रचारा दरम्यान चरणजीत सिंह चन्नी यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. मुख्यमंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर चरणजीत सिंह चन्नी यांनी माध्यमां समोर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पंजाबमध्ये काँग्रेस दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल आणि जनतेचे सरकार स्थापन होईल अशी प्रतिक्रिया चरणजीत सिंह चन्नी यांनी दिली.

पंजाबमध्ये काँग्रेस दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल आणि जनतेचे सरकार स्थापन होईल अशी प्रतिक्रिया चरणजीत सिंह चन्नी यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, काँग्रेस आता पंजाबचा कायापालट करण्यासाठी काम करेल. सगळे काम तुमच्या कृपेने होत आहे. ही एक मोठी लढाई आहे जी मी एकटा लढू शकत नाही. माझ्याकडे ना पैसा आहे, ना हिम्मत. आता पंजाबचे नागरीकच मला हिंमत देतील. मला काम करण्यासाठी तेच मदत करतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT