Maharashtra Lok Sabha Esakal
देश

Maharashtra Lok Sabha: महाराष्ट्रात भूकंप होणार? CM शिंदेंच्या पक्षाचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? बड्या नेत्याचा दावा काय

Maharashtra Lok Sabha Result 2024: लोकसभेचा निकाल जाहीर झाला त्यानंतर देशातील घाडामोडींना वेग आला आहे. अशातच महाराष्ट्रात काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, अशातच लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने ज्या प्रकारे मोठा विजय मिळवला आहे, त्यामुळे राज्यात सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का बसला आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर देशासह राज्याच्या राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातून मोठी माहिती समोर येत आहे. राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. सातपैकी निम्म्याहून अधिक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याबाबत गंभीर आहेत. महाराष्ट्रात काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, अशातच लोकसभेच इंडिया आघाडीने ज्या प्रकारे मोठा विजय मिळवला आहे, त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. अशातच शिंदेंचे खासदार उध्दव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

यासंबधीची पोस्ट सोशल मिडीयावर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी शेअर केली आहे. पोस्टमध्ये सुप्रिया श्रीनेत यांनी "हे तर होणारच होतं, सुत्रांच्या हवाल्याने, शिवसेना शिंदे गटाचे काही खासदार उध्दव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत", असं म्हटलं आहे. त्यांच्या या सोशल मिडीया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी

१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट

२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट

३) उत्तर पश्चिम मुंबई – रविंद्र वायकर – शिवसेना शिंदे गट

४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट

५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट

६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट

७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट

८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट

९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट

१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट

११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट

१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट

१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट

१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट

१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट

१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप

१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस

१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस

१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस (आघाडी)

२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस

२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस

२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस

२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप

२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस

२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप

२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस

२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस

२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस

२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप

३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस

३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट

३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट

३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप

३४) बीड – बजरंग (बप्पा ) सोनवणे– शरद पवार गट (आघाडीवर)

३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट

३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट

३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप

३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट

३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट

४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप

४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप

४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप

४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष

४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार

४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे

४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे

४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस

४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT