CM Eknath Shinde News esakal
देश

Eknath Shinde : लखनऊ विमानतळावर दाखल होताच मुख्यमंत्री बोलले; म्हणाले पहिल्यांदाच...

संतोष कानडे

लखनऊः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लखनऊ विमानतळावर दाखल झालेले आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी लखनऊ विमानतळावर दाखल झालेले असून यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लखनऊ ते अयोध्या भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे. अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच अयोध्येला येत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवसेनेचे नेते लखनऊ विमानतळावर दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे एक मंत्री त्यांच्या स्वागताला दाखल झाले होते. विमानतळ परिसरात रामभक्तांची गर्दी झाली होती. पुष्पहारांनी सर्वांचं स्वागत करण्यात आलं.

पुढे बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, २०१९ मध्ये महाराष्ट्रामध्ये झालेली चूक आम्ही सुधरवली आहे. आम्ही लोकांच्या मनातलं सरकार आणलेलं आहे. असं असलं तरी अयोध्येत आम्ही पक्षिय राजकारण आणणार नाही. आम्ही प्रभू रामाच्या दर्शनासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

  • लखनऊ ते अयोध्या श्रद्धेचं वातावरण तयार झालेलं आहे

  • प्रभू रामचंद्राच्या चरणी मी नतमस्तक होतो

  • अयोध्या आमच्यासाठी श्रद्धेचा, भावनेचा विषय आहे

  • मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा येथे आलो

  • रामभक्तांनी भगवं हिंदुत्वाचं माहोल बनलं आहे

  • प्रभू रामचंद्रांच्या आशीवार्दाने आम्ही सरकार स्थापन केलं

  • २०१९मध्ये चूक झाली होती. लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं

  • अयोध्येत आम्ही पक्षिय राजकारण आम्ही आणणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT