देश

Arvind Kejriwal : ''मी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नसलो तरी...'' अरविंद केजरीवाल थेटच बोलले

संतोष कानडे

Delhi CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशात सुरु असलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरील कारवाईवरुन भाजपवर टीका केली.

केजरीवाल म्हणाले की, आज इमानदार लोकांना जेलमध्ये टाकलं जात आहे तर बेईमान लोकांना पक्षात घेऊन संरक्षण दिलं जातंय. इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर असे प्रकार बंद केले जातील आणि खऱ्या बेईमानांना जेलमध्ये टाकलं जाईल.

यासोबत केजरीवाल म्हणाले की, मी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाही. पण जे सरकार बनेल त्यांच्याकडून मी काम करुन घेईन. पीओके हा भारताचाच भाग असून तो आम्ही घेऊन दाखवू, असं आश्वासन त्यांनी दिलं.

केजरीवालांची १० आश्वासनं

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेला १० गॅरंटी दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी देशातील जनतेला मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल. याअंतर्गत गरिबांना २०० यूनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. यासाठी १.२५ लाख कोटी रुपये खर्च होतील, असं सांगितलं

तसेच देशातील प्रत्येक नागरिकावर मोफत उपचार केले जातील. सरकारी हॉस्पिटलची स्थिती सुधारण्यात येईल३. अग्निवीर योजना बंद केली जाईल आणि अग्निवीरांना कायमस्वरुपी नोकरी दिली जाईल. यासह दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यात येईल आणि एका वर्षामध्ये २ कोटी रोजगार उपलब्ध करून दिले जातील, असं आश्वासन दिलं.

केजरीवाल पुढे म्हणाले की, भाजपच्या वॉशिंगमशीनला चौकात फोडलं जाईल. देशाला भ्रष्टाचार मुक्त केलं जाईल. तसेच जीएसटीचे सुलभीकरण केले जाईल. अशी सुविधा केली जाईल जिथे व्यापारी मोकळेपणाने व्यापार करु शकतील.

यासह सरकारी शाळेमध्ये खासगी शाळांपेक्षा चांगलं शिक्षण दिलं जाईल. यासाठी ५ लाख कोटी रुपये लागतील. यासाठी राज्य सरकार अर्धे आणि केंद्र सरकार अर्धे पैसे देईल आणि देशाच्या जितक्या जमिनीवर चीनने ताबा मिळवला आहे, ती सर्व जमीन पुन्हा मिळवली जाईल. यासाठी सैन्याला पूर्ण सूट दिली जाईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या धान्यावर एमएसपीच्या आधारे पूर्ण किंमत दिली जाईल, अशी आश्वासनं त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT