Mamata Banerjee टिम ई सकाळ
देश

'विमानांची धडक टळली', पायलटमुळे ममता बॅनर्जी दुर्घटनेतून बचावल्या

सकाळ डिजिटल टीम

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विमानाची दुर्घटना थोडक्यात टळली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विमानाची दुर्घटना थोडक्यात टळली आहे. दोन विमानं समोर आल्यानं झालेल्या अपघातात ममता बॅनर्जी यांच्या छातीला आणि पाठिला दुखापत झाली असल्याचं समजते. उत्तर प्रदेशातील प्रचार संपवून परत येत असताना हा अपघात घडला होता अशी माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत पायलटने प्रसंगावधान राखल्यानं मोठी दुर्घटना टळली.

पायटलने विमान कमी उंचीवरून घेतल्यानं दोन विमानांची टक्कर समोरासमोर होण्यापासून टळली. यावेळी ममता बॅनर्जी यांना किरकोळ दुखापत झाली. ममता बॅनर्जींच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबतचा अहवाल पश्चिम बंगाल सरकारने शनिवारी मागवला होता. ममता बॅनर्जी या उत्तर प्रदेश दौऱ्यावर गेल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी या घटनेची माहिती दिली आहे. 'अचानक माझ्या विमानासमोर विमान आलं, त्यावेळी पायलटने मोठ्या शिताफीने विमानावर नियंत्रण ठेवलं आणि विमान ६ हजार फूट खाली घेतलं. यावेळी अचानक बसलेल्या धक्क्यानं माझ्या पाठीला आणि छातीला दुखापत झाली', अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.

दसॉल्ट फालकॉन २००० या विमानातून ममता बॅनर्जी प्रवास करत होत्या. विमानाची धडक होण्याचा प्रसंग टळल्यानंतर विमान नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर उतरवण्यात आलं. ज्यावेळी अचानक विमान कमी उंचीवर घेण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा मोठ्या प्रमाणावर धक्के बसले. यामुळे ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली. या घटनेबाबतची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT