CM Pushkar Singh Dhami esakal
देश

समान नागरी कायद्यानंतर धामी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

धामी सरकारनं राज्यातील जंगलांमध्ये बेकायदेशीरपणे बांधलेल्या धार्मिक स्थळांबाबत मोठा निर्णय घेतलाय.

उत्तराखंडच्या (Uttarakhand) पुष्कर सिंह धामी सरकारनं (CM Pushkar Singh Dhami) राज्यातील जंगलांमध्ये बेकायदेशीरपणे बांधलेल्या धार्मिक स्थळांबाबत मोठा निर्णय घेतलाय. राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं की, राज्यातील ज्या-ज्या ठिकाणी धार्मिक स्थळांच्या नावाखाली वनजमिनीवर अतिक्रमण झालंय, ते हटवलं जाईल, असा इशारा दिलाय.

खरं तर राज्याच्या निर्मितीनंतर राज्यातील जागांवर विशिष्ट पंथाच्या धार्मिक स्थळांची संख्या वाढलीय. त्यासाठी स्थानिक जनता आणि हिंदू संघटनांनी (Hindu Organization) अनेकदा निदर्शनं केली आहेत. मात्र, आता राज्य सरकार याबाबत कठोर पावलं उचलणार आहे. यासाठी धामी सरकारनं जिल्हा प्रशासन आणि वनविभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत.

एका कार्यक्रमात सहभागी होत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, राज्यातील सरकार बेकायदा बांधकामांबाबत कठोर असून, मागील काही काळात धार्मिक स्थळांच्या नावाखाली राज्यातील वनजमिनींवर कब्जा केला जात आहे. त्याबाबत राज्य सरकारनं निर्णय घेतलाय. राज्यातील अतिक्रमणाविरोधात शासन कठोर असून वनजमिनींवर जिथं अतिक्रमण झालंय, तिथं अधिकाऱ्यांना मार्किंग करण्यास सांगितलंय. धार्मिक स्थळांच्या नावाखाली होणारी अतिक्रमणं व बांधकामे हटविण्यात येणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलंय.

वनविभागाच्या दहा हजार हेक्टर जमिनीवर अतिक्रमण

राज्याचे मुख्य वनसंरक्षक विनोद सिंघल यांनी सांगितलं की, 'याबाबतचा निर्णय वनविभागानं घेतला असून सर्व डीएफओंना अतिक्रमणांवर मार्किंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील वनविभागाच्या दहा हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण झाल्याचा खुलासा त्यांनी केलाय. त्यात प्रामुख्यानं धार्मिक स्थळांचा समावेश आहे. वनजमिनीवरील अतिक्रमणाच्या बाबतीत उत्तराखंड संपूर्ण देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT