CM Siddaramaiah esakal
देश

'म्हैसूर विकास प्राधिकरणात मुख्यमंत्र्यांनी चार हजार कोटींची जमीन लाटली'; विरोधी पक्षनेत्याचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी पत्नीच्या नावावर बेकायदेशीरपणे ‘मुडा’ने संपत्ती हस्तांतरित केल्याच्या आरोप फेटाळून लावला.

सकाळ डिजिटल टीम

सिद्धरामय्याजी तुमच्या पत्नीच्या नावावर जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण केले आहे. त्याचे तुम्ही कसे समर्थन करता?

बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळात (Valmiki Development Corporation) १८७ कोटींचा गंडा घालणाऱ्या मुख्यमंत्री सिध्दरामय्या (CM Siddaramaiah) यांनी आता म्हैसूर विकास प्राधिकरणात (मुडा) चार हजार कोटींची जमीन लाटली असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी पत्नीच्या नावावर बेकायदेशीरपणे ‘मुडा’ने संपत्ती हस्तांतरित केल्याच्या आरोप फेटाळून लावला. हा प्रकार भाजपच्या (BJP) काळातला आहे. एक एकर १५ गुंठे जमीन माझ्या पत्नीच्या नावावर आहे. माझ्या पत्नीच्या मेव्हण्याने ही जमीन घेतली आणि माझ्या पत्नीच्या नावे केली. मी सत्तेत असताना जमीन खरेदी केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सोशल नेटवर्किंग साइट ‘एक्स’वर पोस्ट करुन अशोक म्हणाले, सिद्धरामय्या यांनी केलेल्या चार हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत उत्तरे तुमच्याकडे आहेत का? असे त्यांनी विचारले. सिद्धरामय्याजी तुमच्या पत्नीच्या नावावर जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण केले आहे. त्याचे तुम्ही कसे समर्थन करता? तुम्ही आरोपी मुडा अधिकाऱ्यांना निलंबित केले नाही, तर त्यांची नुसती बदली करून हात धुवून घेतलेत, तुम्ही कोणाचे रक्षण करणार आहात? याची दखल घेण्यात आली आहे.

चार हजार कोटींचे हे प्रचंड भ्रष्टाचाराचे प्रकरण सीबीआयकडे किंवा निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगाकडे सोपवले पाहिजे. त्याशिवाय तपासासाठी दोन आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली पाहिजे. घोटाळ्यात तुमचा वाटा काय आहे? असेही त्यांनी विचारले. सिद्धरामय्या म्हणाले, ‘‘हा व्यवहार भाजपच्या काळात झाला आहे. कायद्यानुसार ५०:५० या प्रमाणात जमीन दिली जाईल, असे ‘मुडा’ने सांगितले.

मात्र, मुडाच्या अधिकाऱ्यांनी जमीन निश्चित करून वाटणी केली. मुडाने ५०:५० च्या प्रमाणात तुम्हाला जमीन देऊ असे सांगितले. त्यांनी आम्हाला कायद्यानुसार जमीन दिली आहे.’’ काँग्रेस नेते लक्ष्मण म्हणाले की, २००४ मध्ये केसरे गावातील ३.१६ एकर जमीन मल्लिकार्जुन यांच्या मालकीची होती. १९८८ मध्ये देवनूर बारंगेच्या बांधकामासाठी जमीन संपादित करण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांनी त्यांना ही जमीन देणगीच्या कराराद्वारे दिली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

IND vs SL 1st Test: देवदत्त पडिक्कल IN, सर्फराज खान OUT! गंभीरने खेळपट्टी पाहिली अन् Playing XI ठरली; जाणून घ्या संभाव्य संघ

Surat-Chennai Expressway : परंडा-तुळजापूर तालुक्यातील 31 गावांत भूसंपादन वेगात; शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींचा मोबदला, 481 हेक्टर क्षेत्र ताब्यात

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

SCROLL FOR NEXT