लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Ladki Bahin: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हफ्ता अद्याप देण्यात आलेला नाही. आता जुलै आणि ऑगस्टचा हफ्ता एकत्रच दिला जाण्याची शक्यता आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Payment: ₹3,000 May Be Credited for Two Months

Esakal

Updated on

Ladki Bahin Yojana Installment: लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारनं पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरला आहे. महिला आणि बाल विकास विभागाल सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग करण्यात आलाय. याबाबत शासन निर्णयसुद्धा जारी केला आहे. यामुळे लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनच्या आधी हफ्ता मिळण्याची शक्यता आहे. रक्षाबंधनला लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे दोन्ही हफ्ते दिले जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com