तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

Tukaram Mundhe: अन्न व औषध प्रशासनाने डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
FDA Action on Domino's

FDA Action on Domino's

ESakal

Updated on

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात धडक कारवाया सुरु केल्या जात आहेत. या कारवायांमुळे अन्न माफियांवर आळा बसला आहे. नुकतेच एफडीएने १० मिनिटांत डिलिव्हरी पोहोचवणाऱ्या ब्लिंकइटच्या मुंबई येथील गोदामावर धाड टाकली. या कारवाईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना निलंबित करण्यात आला होता. एफडीएची ही कारवाई चर्चेत असताना आता पुन्हा डॉमिनोज पिझ्झाला मोठा दणका दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com