देश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना, अमित शाह यांच्यासोबत बैठक

सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीतील बैठकीसाठी मुंबईतून रवाना झाले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर राहणार आहेत. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अमित शाह यांनी आज, रविवारी नक्षलवादाच्या मुद्द्यावर बैठक बोलवली आहे. त्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत. दोन दिवसांपुर्वीच दिल्ली दौऱ्याबद्दल माहिती मिळाली होती. नक्षलवाद आणि माओवादाविरोधात केंद्र सरकार कठोर भुमिका घेणार असून, याबद्दल एक नवी योजना आखण्याच्या तयारीत आहे. यासाठी राज्यांना देखील विश्वासात घेतलं जाणार असल्याचं समजतेय. देशातील नक्षल आणि माओग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावी सहकारी या विधानानंतर चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. नक्षलवादाच्या मुद्द्यावर अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये खासगीत काही चर्चा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या मागील दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अर्धा तास खासगीत चर्चा झाली होती.

आज सकाळी दहा वाजता बैठक पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे अमित शहा यांची वेगळी भेट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रामधील गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या भागांमध्ये नक्षलवादाची समस्या प्राकर्षाने दिसून येणार आहे. या भागांमध्ये विकास कामांना गती देण्यास केंद्राचे तसेच राज्याचे प्राधान्य आहे. मात्र, आता नक्षलवादाची समस्या मोठ्या शहरांमध्ये निर्माण होऊ शकते, अशी भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त करण्यात आली आहे. या गंभीर मुद्द्यावर केंद्र आणि राज्यांनी एकत्र काम करण्याची गरज असून, पुढील वाटचाल कशी असावी? यासंदर्भात चर्चा करण्याकरिता केंद्राकडून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

Eknath Shinde : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; कर्जमाफीचा मोठा दिलासा देणार : एकनाथ शिंदे

UPSC CSE Notification 2026 : UPSC नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT