narendra modi uddhav thackeray
narendra modi uddhav thackeray 
देश

मुख्यमंत्र्यांचे विमान दिल्लीत दाखल, पंतप्रधान मोदींची घेणार भेट

कार्तिक पुजारी

राज्यासमोर असलेल्या विविध प्रश्‍नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहे

नवी दिल्ली- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विमान दिल्लीत पोहोचले असून मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात गेले आहेत. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी रवाना होतील. पंतप्रधानांच्या भेटीनंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता ते पंतप्रधान मोदींची भेट घेतील. मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींना निवेदन देणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणप्रकरणी केंद्रावर दबाव आणण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणप्रकरणी आक्रमक झाले असून 16 जूनपासून त्यांनी आंदोलनाची हाक केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणप्रकरणी तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर भेटीत नेमकं काय चर्चा होते हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. (cm uddhav Thackeray will meet pm narendra modi delhi maratha reservation)

ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे उच्चस्तरीय शिषटमंडळ मोदींबरोबर चर्चा करणार आहे. मराठा आरक्षण प्रश्नी केंद्राचा हस्तक्षेप, राज्याला कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करणे, जीएसटी थकबाकीची रक्कम राज्याला त्वरित देणे या ठळक मुद्यांचा चर्चेत समावेश असणार आहे, हे स्पष्ट आहे.

पंतप्रधान मोदींबरोबर चर्चिल्या जाणाऱ्या मुद्द्यांबाबत त्यांना राज्य सरकारच्या वतीने एक निवेदन किंवा पत्रही देण्यात येणार आहे. पंतप्रधानांशी चर्चेदरम्यान ज्या ठळक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, त्यात मराठा आरक्षणाचा व लशींच्या तुटवड्यावर केंद्राने मदतीचा हात देण्याच्या मुद्यांचा ठळक अंतर्भाव असेल. सर्वोच्च न्यायालयाने राज्याचा मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यावर मुख्यमंत्र्यांनी, हा मुद्दा सोडविणे व आरक्षण देणे आता केंद्राच्या हाती असल्याचे सांगितले होते. शहाबानो व अन्य प्रकरणांत संसदेने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांना बाजूला सारून निर्णय घेतले होते. मराठा आरक्षण प्रश्‍नीही केंद्राने पुढाकार घ्यावा, अशी राज्याची इच्छा आहे. याशिवाय राज्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्राकडून जास्त लसमात्रा मिळणे, जीएसटीचा सुमारे २४ हजार रूपयांचा थकबाकीचा हप्ता राज्याला मिळणे, पदोन्नतीत आरक्षण आदी मुद्यांवरही मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्यादरम्यान चर्चा होणे शक्य आहे.

फेरविचार याचिका आणि राज्याचा अधिकार

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना उद्याच्या भेटीत मराठा आरक्षणावर महाराष्ट्राची बाजू मांडताना काय बोलायला हवे, याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही सूचना केल्याचे समजते. राज्यांचा आरक्षण देण्याचा अधिकार अबाधित आहे हे लक्षात आणून द्यावे, तसेच फेरविचार याचिका करतो आहोत, हे सांगून सामाजिक अभिसरणासाठी मराठा समाजाचे आरक्षण अबाधित ठेवण्याचा मुद्दा केंद्राने समजून घ्यावा असेही सांगण्याची सूचना केली. ४० मिनिटे चाललेल्या या भेटीत उपमुख्यमंत्री अजित पवारही हजर होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

SCROLL FOR NEXT