Yogi Adityanath esakal
देश

Yogi Adityanath : अतिआत्मविश्वास नडला! उत्तर प्रदेशातल्या पराभवाला जबाबदार कोण? पक्ष की सरकार? योगी आदित्यनाथ म्हणाले...

BJP Uttar Pradesh : उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, संघटना ही सरकारपेक्षा मोठी असते. कोणतीच व्यक्ती किंवा कोणतंच सरकार संघटनेपेक्षा मोठं असू शकत नाही. मोठ्या वृक्षाच्या लाकडापासून जेव्हा कुऱ्हाड बनते तेव्हा ते झाड तोडलं जाऊ शकतं.

संतोष कानडे

Uttar Pradesh Loksabha results : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश राज्यामध्ये भाजपला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून पराभवाची समीक्षा केली जात आहे. भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची एक बैठक रविवारी लखनऊमध्ये पार पडली.

या बैठकीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीती पराभवावर चर्चा झाली तर भविष्यातील रोडमॅप निश्चित केला गेला.

बैठकीमध्ये काही गोष्टी अशा घडल्या, त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवाला नेमकं जबाबदार कोण? पक्षसंघटना की राज्य सरकार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच पक्ष आणि सरकारमधील समन्वयावरुन काही नेते बोलले.

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, संघटना ही सरकारपेक्षा मोठी असते. कोणतीच व्यक्ती किंवा कोणतंच सरकार संघटनेपेक्षा मोठं असू शकत नाही. मोठ्या वृक्षाच्या लाकडापासून जेव्हा कुऱ्हाड बनते तेव्हा ते झाड तोडलं जाऊ शकतं.

मौर्य यांनी कार्यकर्त्यांसमोर येणाऱ्या अडचणींचाही उल्लेख केला. म्हणाले की, ज्या तुमच्या वेदना आहेत, त्याच आमच्याही वेदना आहेत. त्यांच्या या विधानाने टाळ्या मिळाल्या परंतु अनेक प्रश्न त्यामुळे उपस्थित झाले.

मुख्यमंत्री योगींनी आपल्या संबोधनात दोन मुद्द्यांना स्पर्श केला. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात झालेला आपला पराभव हा अतिआत्मविश्वासाचा पराभव आहे. विरोधी पक्षाने ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर केला, त्याला आपण काऊंटर करु शकलो नाहीत.

यावेळी मुख्यमंत्री आदित्यनाथांनी नेते आणि कार्यकर्त्यांना टास्क देऊन पोटनिवडणुकीमध्ये ताकद दाखवून देण्याचं आवाहन केलं. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी साध्या कार्यकर्त्यांचं हे काम नाही.. आपल्याला चॅलेंज घेणारे लोक हवे आहेत, असं म्हटलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT