Yogi Adityanath esakal
देश

योगींच्या हेलिकॉप्टरला पक्ष्याची धडक, वाराणसीत हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

सकाळ डिजिटल टीम

योगी आदित्यनाथ एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वाराणसीत पोहोचले होते.

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या हेलिकॉप्टरचं Helicopter वाराणसीमध्ये (Varanasi) नुकतंच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. हेलिकॉप्टर पक्ष्याला धडकल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलं जातंय.

मुख्यमंत्री आदित्यनाथ आता विशेष विमानानं लखनौला रवाना होणार असल्याचं वृत्त आहे. योगी आदित्यनाथ एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वाराणसीत पोहोचले होते, असं सांगण्यात येतंय. येथून लखनौला उड्डाण केल्यानंतर त्यांचं हेलिकॉप्टर एका पक्ष्याला धडकलं. यानंतर हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित सुरक्षा अधिकाऱ्यांनी सीएम योगींच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर योगी आदित्यनाथ वाराणसीतील सर्किट हाऊसमध्ये काही काळ थांबले. मुख्यमंत्री योगी आता विशेष विमानानं लखनौला रवाना होणार असल्याचं सांगण्यात येतंय. योगी आदित्यनाथ लखनौमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT