Yogi Adityanath Team eSakal
देश

योगी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; 77 कोटींचं पॅकेज जाहीर

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने हे पॅकेज जाहीर केलं.

सुधीर काकडे

लखनऊ: उत्तर प्रदेश सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारने 77.88 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. उत्तर प्रदेशमधील सुमारे 2.35 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पिकांच्या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर सरकारने मदत पॅकेज जाहीर केले आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे योगी सरकारचा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी तब्बल 77,88,96,748 रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. त्यानुसार उत्तर प्रदेशमधील 35 जिल्ह्यांतील 2,35,122 शेतकऱ्यांना या पॅकेजचा फायदा होणार आहे. शुक्रवारी एका उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या परिस्थितीचा आढवा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल मनोजकुमार सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की, पूर आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. त्यानुसार 35 जिल्ह्यांमध्ये 2,35,122 शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे.

देवरिया, महाराजगंज, सिद्धार्थ नगर, गोरखपूर, मिर्झापूर, संत कबीर नगर, सीतापूर, कुशी नगर, बलिया, बहराइच, मौ, वाराणसी, झाशी, गाझीपूर, बाराबंकी, जालौन, खेरी, ललितपूर, चंदौली, कौशांबी, आंबेडकरनगर , बिजनौर, बस्ती, गोंडा, चित्रकूट, बलरामपूर, बांदा, औरैया, फर्रुखाबाद, पीलीभीत, लखीमपूर, कानपूर देहाट, भदोही, सुलतानपूर, आग्रा, आणि श्रावस्ती या 35 जिल्हयांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT