‘यूपी’तील माफियांवर योगींचे बुलडोझर sakal
देश

CM योगी 'सुपर सरन्यायाधीश'; बुलडोझर प्रकरणावरुन ओवैसींची टीका

भाजपकडून भारतीय मुस्लिमांना एकत्रित शिक्षा दिली जात असल्याचा केला आरोप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे. CM योगी हे 'सुपर चीफ जस्टिस' असल्याचं औवेसी यांनी म्हटलं आहे. भारतीय मुस्लिमांना भाजपकडून एकत्रितरित्या शिक्षा दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (CM Yogi Adityanath Super Chief Justice Owaisi criticism of bulldozer case)

ओवैसी म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सुपर चीफ जस्टिस बनले आहेत. त्यांच्या स्वतःच्या कोर्टात ते कोणालाही दोषी ठरवू शकतात. आफरिन फातिमा यांचे घर त्यांच्या आईच्या नावे आहे. भाजप केंद्रीय मंत्री आशिष मिश्रा यांच्या मुलाचं घर पाडत नाहीत ज्यांनी पाच लोकांचा जीव घेतला आहे. भाजपकडून भारतीय मुस्लिमांना एकत्रितरित्या शिक्षा देत आहे.

दरम्यान, मोदी सरकारवरही यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. मोदी सरकारनं ८ वर्षामध्ये १६ कोटी रोजगार द्यायला हवे होते. पण आता ते ५ लाख रोजगाराच्या बाता मारत आहेत. येत्या २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सर्व सुरु आहे. केंद्र सरकारनं ५५ लाख पद भरतींना मंजुरी दिली आहे. पण यांपैकी ते केवळ १० लाख रोजगार देणार आहेत, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT