Coal sakal
देश

वीजसंकट आणखी गडद; सात वर्षानंतर पहिल्यांदाच कोळसा आयात करणार

भारतातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी या वर्षी पहिल्यांदाच कोल इंडिया इंधनाची आयात करणार आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : भारतीय कोळसा कंपनी कोल इंडिया भारतातील वीज तुटवडा भरून काढण्यासाठी इंधनाची आयात करणार आहे. देशात वीज तुटवड्यामुळे त्रास होऊ नये म्हणून केंद्रीय उर्जा मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. दिवसेंदिवस भारतातील वीजसंकट आणखी गडद होत असून त्यामुळे भविष्यात त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील सर्वांत मोठी कोळश्याची खाण असलेली कोल इंडिया आयात केलेल्या कोळश्याचा वीज बनवण्यासाठी वापर करणार आहे.

(Coal Import)

दरम्यान २०१५ साली कोल इंडियाने इंधनाची आयात केली होती. यावर्षीच्या एप्रिलमध्ये राज्यात आणि देशभरात वीजतुटवडा निर्माण झाला होता. ही परिस्थिती परत उद्भवू नये यासाठी केंद्रीय आणि राज्यातील उर्जा मंत्र्याने हा निर्णय घेतला आहे. मागच्या सहा वर्षातील वीजेसंदर्भातील परिस्थिती रोखण्याचं मुख्य आव्हान देशासमोर आहे. "कोल इंडिया हा भारतातील सरकार ते सरकार वीज पुरवण्यासाठी कोळसा आयात करेल आणि देशात वीज पुरवठा करेल." असं केंद्रीय उर्जामंत्रालयाने सांगितलं आहे.

यासंदर्भातील पत्र सर्व केंद्रीय उर्जा अधिकारी, राज्यातील अधिकारी आणि कोल इंडियाच्या चेअरमन यांना पाठवण्यात आलं आहे. २०२२ च्या पहिल्या तिमाहीत भारतात वीजेच्या तुटवड्यामुळे त्रास सहन करावा लागला होता. उर्जामंत्रालयाने दिलेल्या पत्रात म्हटलंय की, राज्यांद्वारे कोळसा आयातीच्या अनेक निविदांमध्ये गोंधळ निर्माण होईल त्यासाठी कोल इंडियाद्वारे केंद्रीकृत खरेदीची मागणी केली आहे. परंतु ऊर्जा मंत्रालयाने शनिवारी राज्यांना प्रक्रियेत असलेल्या निविदा स्थगित करण्यास सांगितले.

"कोळसा आयात करण्यासाठी राज्य जनरेटर आणि IPPs द्वारे सुरू असलेल्या निविदा कोल इंडियाच्या किमतीच्या शोधाची प्रतीक्षा करण्यासाठी स्थगित ठेवल्या जाऊ शकतात, जेणेकरून कमीत कमी संभाव्य दराने कोळसा खरेदी करता येईल," असं मंत्रालयाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

Ebola Case: काळजी वाढवणारी बातमी! काँगोहून आला अन् तब्येत बिघडली… अहमदाबादमध्ये इबोलाच्या संशयाने खळबळ, ४ जण आयसोलेट

‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

SCROLL FOR NEXT