cobra snake enters young man jeans pant in uttar pradesh 
देश

झोपलेल्या युवकाच्या पॅंटमध्ये शिरला कोब्रा अन्...

वृत्तसंस्था

मिर्झापूर (उत्तर प्रदेश): एक युवक झोपलेला असताना त्याच्या पँटीमध्ये कोब्रा शिरला. वळवळ होऊ लागल्यामुळे तसाच उभा राहिला. तब्बल सात तास न हालता एकाच जागेवर उभा होता. दुसऱया दिवशी पॅंट कापून नागाला सर्पमित्राने बाहेर काढल्यानंतर युवकाची सुटका झाली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मिर्झापूरपासून जवळ असलेल्या सिकंदराबादमध्ये सौभाग्य योजनेत काही मजूर काम करत होते. एका शाळेमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर काम केल्यानंतर रात्री जेवण केल्यानंतर कामगार झोपी गेले होते. लवलेश नावाच्या युवक झोपेत असताना त्याच्या पँटीमध्ये वळवळ होऊ लागली. रात्री बाराच्या सुमारास जाग आल्यानंतर पँटीमध्ये साप असल्याचे लक्षात आले. यामुळे तो हळूच खांबाला धरून उभा राहिला. पण, हालचाल केली तर साप चावण्याची भिती होती. यामुळे तो आहे त्या अवस्थेत तसाच उभा राहिला.

साप चावण्याची शक्यता असल्याने कोणीही तो काढण्याचा प्रयत्न केला नाही. दुसऱया दिवशी सकाळ झाल्यावर सर्पमित्राला बोलवण्यात आले. याबाबत त्याला माहिती दिल्यानंतर त्याने अलगद जीन्स पँट कापली आणि सापाला बाहेर काढले. साप बाहेर काढल्यानंतर तो कोब्रा असल्याचे समजले. तब्बल सात तास तो एकाच जागेवर उभा होता. युवकाचे नशिब बलवत्तर यामुळे तो वाचला, असे उपस्थितांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

SCROLL FOR NEXT