देश

Vande Bharat Cockroach: 'वंदे भारत' प्रिमियम ट्रेनमध्ये जेवणात आढळलं झुरळ! प्रवाशानं थेट अश्विनी वैष्णव यांच्याकडं केली तक्रार

'वंदे भारत' या भारताच्या प्रिमियम ट्रेनसंदर्भातील अनेक तक्रारी यापूर्वी आलेल्या आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : 'वंदे भारत' या भारताच्या प्रिमियम ट्रेनसंदर्भातील अनेक तक्रारी यापूर्वी आलेल्या आहेत. यामध्ये पावसाळ्यात गळणारे डबे तर रेल्वे ट्रॅकवर आलेल्या भटक्या जनावरांमुळं झालेलं ट्रेनचं नुकसान या गोष्टींचा समावेश आहे. त्यात आता या ट्रेनमधील जेवणात झुरळ आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

पण विशेष म्हणजे ज्या प्रवाशाच्या जेवणात हे झुरळ आढळून आलं त्यानं थेट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून रेल्वेच्या केटरिंग व्यवस्थेवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली. (Cockroach found in food in Vande Bharat premium train passenger complained directly to Railway Minister Ashwini Vaishnav)

भोपाळहून आग्र्याला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये मंगळवारी हा प्रकार घडला आहे. विदित वर्ष्णे यांनी यासंदर्भात आपल्या नातेवाईकांच्यावतीनं तक्रार करणारी पोस्ट फोटोसहित सोशल मीडियावर लिहिली. यामध्ये एक मृत झुरळं भाजीमध्ये आढळलेला फोटो शेअर केला आहे. ही तक्रार त्यांनी आयआरसीटीसीला देखील टॅग केली. विशेष म्हणजे ज्या जोडप्याच्या जेवणात झुरळ आढळलं त्यांनी थेट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना संपर्क केल्याची माहितीही मिळतेय. तसेच या प्रकाराबद्दल केटरिंग कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, आयआरसीटीसीनं वर्ष्णे यांच्या तक्रारीची गुरुवारी दखल घेतली. प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, तुम्हाला प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेण्यात आली असून योग्य तो दंड सेवा देणाऱ्या कंपनीला ठोठावण्यात आला आहे.

आम्ही केटरिंग सेवा अधिकाधिक काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न करु. वर्ष्णे यांनी पुढे असंही म्हटलं की, आमचे काका आणि काकू हे लकी ठरले की त्यांनी हे झुरळं नकळत का होईना खाल्ल नाही. पण ज्या भांड्यामध्ये ही भाजी तयार केली गेली ही भाजी इतर प्रवाशांनी खाल्लीच असेल.

दरम्यान, असाच प्रकार सिलिगुडी ते लोककाता या वंदे भारत ट्रेनमध्ये मार्च महिन्यात घडला होता. यामध्ये एका प्रवाशाला रेल्वेत मागवलेल्या दालमध्ये झुरळाचा पाय आढळून आला होता. पण त्यावेळी त्यांनी कोणतीही तक्रार किंवा नुकसान भरपाई मागितली नव्हती पण अधिकाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी असा सल्ला दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: होमगार्ड तरुणीचा खून मैत्रिणीकडून,मृतदेह फेकण्यासाठी घेतली मुलाची मदत

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT