Air India 
देश

Air India : एअर इंडियाच्या विमानात झुरळं, विषारी स्प्रे; संयुक्त राष्ट्राच्या राजदुतांची ट्विट करून तक्रार

Latest Marathi News: गेल्या काही महिन्यांपासून विमानातील सुविधांबाबत अनेक तक्रारी येत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून विमानातील सुविधांबाबत अनेक तक्रारी येत आहेत. अनेकदा प्रवाशांशी गैरवर्तन करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता अशीच तक्रार संयुक्त राष्ट्राच्या राजदुतांनी केली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे राजदूत गुरप्रीत एअर इंडियाच्या विमानाने अमेरिकेहून नवी दिल्लीला येत होते, पण या उड्डाणादरम्यान त्यांना खूप त्रास झाला. विमानाची सीटही तुटली होती. शिवाय त्यांना झुरळाने चावा घेतल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.

गुरप्रीत यांनी १२ मार्च रोजी आपल्या ट्विटर हँडलवर काही फोटो शेअर केले होते आणि त्यांना काय प्रकारचा त्रास होता हे सांगितले होते. गुरप्रीतने ट्विट केले होते की, "संयुक्त राष्ट्रसंघाचा राजदूत म्हणून मी जगभर फिरलो आहे.

पण एअर इंडिया १०२ जेएफके (जॉन एफ केनेडी विमानतळ, न्यूयॉर्क) ते दिल्ली हा प्रवास माझा सर्वात वाईट विमानप्रवास आहे. तुटलेली खुर्ची, मनोरंजन/कॉल बटण/ वाचनासाठीचे दिवे नाहीत. पण भरपूर झुरळे आणि विषारी फवारणी होती. ग्राहक सेवेकडे पूर्णदुर्लक्ष केल्याचं त्यांनी म्हटलं.

सोमवार, 20 मार्च रोजी गुरप्रीत यांनी पुन्हा एकदा आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केले आणि रतन टाटा यांना ही टॅग केले. न्यूयॉर्कहून एअर इंडियाच्या विमानात झुरळे कसे होते?

न्यूयॉर्कहून येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानांवर झुरळे कसे, सुरक्षा उपकरणांशिवाय नॉन-ऑपरेशनल स्टँडर्डमध्ये बोर्डिंग कसे चालते याबद्दल काही स्पष्टीकरण आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT