Cognizant to hire over 20000 graduates this year 
देश

खूशखबर ! या कंपनीत आहे २० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीची कॉग्निझंट टेक्‍नॉलॉजी कंपनी चालू वर्षात तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून अभियांत्रिकी आणि विज्ञान पदवीधर विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

सध्याच्या काळात महाविद्यालयांतून शिक्षण घेऊन बाहेर पडणारी मुले डिजिटल तंत्रज्ञानाची जाण असलेली आहेत. अशा विद्यार्थ्यांची निवड करण्याचे कंपनीचे धोरण आहे, असे "कॉग्निझंट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन हम्फ्रीज यांनी म्हटले आहे; तसेच या वर्षी अभियांत्रिकीच्या पदवीधरांची निवड करताना "पॅकेज'मध्ये 18 टक्‍क्‍यांची वाढही करण्यात आली आहे. यामुळे कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना किमान 4 लाखांचे वार्षिक वेतन मिळणार आहे.

Delhi Election : तिवारी म्हणाले होते 'ट्विट जपून ठेवा'; निकालनंतर होतायेत ट्रोल

कॉग्निझंटने काही दिवसांपूर्वीच जगभरात 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे जाहीर केले होते. मात्र, भारतातील मनुष्यबळ वाढविण्याची कंपनीची योजना आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कॉग्निझंट 2 लाख कर्मचारी असणारी देशातील दुसरी "आयटी' कंपनी बनली होती. या यादीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आघाडीवर असून, इन्फोसिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॉग्निझंटचे मुख्यालय अमेरिकेत आहे. त्यामुळे ती देशातील सर्वाधिक कर्मचारी असणारी बहुराष्ट्रीय कंपनी बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT