PM Narendra Modi Sakal
देश

PM Narendra Modi: "...तर नोटांवरही गांधीजींच्या ऐवजी नरेंद्र मोदींचा फोटो छापला जाईल"

अहमदाबादमधल्या एका मेडिकल कॉलेजचं नाव बदलून नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज असं करण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव अहमदाबादमधल्या एका वैद्यकीय महाविद्यालयाला दिलं जाणार आहे. महानगर पालिकेच्या बैठकीत याविषयीचा निर्णयही झाला आहे. मात्र यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उद्या नोटांवरही महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी नरेंद्र मोदींचे फोटो लावले जातील, अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे.

अहमदाबादमधल्या एलजी महाविद्यालयाचं नाव बदलून नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज असं ठेवण्यात येणार आहे. अहमदाबाद महानगर पालिकेने हा निर्णय घेतला आहे. मात्र यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि उद्योगमंत्री केटी रामा राव यांनी पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. उद्या निर्मला सीतारामन यांना वाटलं तर त्या रिझर्व बँकेला नोटेवरही महात्मा गांधींजींच्या फोटोच्या जागी नरेंद्र मोदींचे फोटो लावण्याचे आदेश देतील. केटी रामा राव यांनी याबद्दलचं ट्वीट केलं आहे.

हे मेडिकल मणिनगर भागामध्ये येतं. या एलजी मेडिकल कॉलेजच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये या महाविद्यालयाचं नाव बदलून नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज असं करण्याचा निर्णय झाला. याच मणिनगर भागातून पंतप्रधान मोदी तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT