Colonel Ajay Kothiyal Joines BJP esakal
देश

'आप'ला मोठा झटका; मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या उमेदवाराचा भाजपात प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

निवृत्तीनंतर कर्नल कोठियाल यांनी तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केलीय.

डेहराडून : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत (Uttarakhand Assembly Election) आम आदमी पक्षाचा (Aam Aadmi Party) मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले कर्नल अजय कोठियाल (Colonel Ajay Kothiyal) यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय.

आज (मंगळवार) डेहराडून येथील प्रदेश भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (CM Pushkar Singh Dhami) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांच्या उपस्थितीत कोठियाल यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. भाजप कर्नल यांना महत्त्वाची जबाबदारी देऊ शकतं, असं मानलं जातंय.

कर्नल कोठियाल आणि त्यांच्या समर्थकांनी नुकताच आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष कौशिक आणि इतर नेत्यांशी अनेक चर्चेनंतर कर्नल कोठियाल यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याचं मान्य केलं होतं. कर्नल कोठियाल यांनी जून 2013 मध्ये केदारनाथ येथील दुर्घटनेनंतर धामच्या पुनर्बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. निवृत्तीनंतर त्यांनी तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठीही प्रशिक्षण देण्यास सुरुवात केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT