देश

CDS जनरल बिपीन रावत यांचा भाऊ भाजपमध्ये; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिवंगत CDS जनरल बिपिन रावत यांचे धाकटे भाऊ कर्नल विजय रावत (निवृत्त) (Colonel Vijay Rawat - retired), दिल्लीत भाजपमध्ये सामील झाले आहेत. (CDS General Bipin Rawat) कर्नल विजय रावत (निवृत्त) यांनी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीपूर्वीच केलेल्या या प्रवेशामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

यावेळी त्यांनी म्हटलंय की, भाजपमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझे वडील निवृत्तीनंतर भाजपमध्ये होते आणि आता मला संधी मिळाली आहे. पंतप्रधान मोदींची दृष्टी आणि विचार अतिशय सुज्ञ आणि दुरदृष्टी असणारे आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला आहे. विजय रावत यांनी दिल्लीत उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याच्या काही तासांनंतरच हा प्रवेश केला आहे.

उत्तराखंडमधील पौरी गढवाल येथील सीडीएस रावत यांचा 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह अन्य 13 जणांसह मृत्यू झाला होता. 70 सदस्यीय उत्तराखंड विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT