Shyam Rangeela Esakal
देश

Video: मोदींची मिमिक्री करणाऱ्या कॉमेडियन श्याम रंगिलाला उमेदवारी अर्जच मिळेना! वाराणसीमधून लढण्यासाठी सज्ज

Comedian Shyam Rangeela: श्याम रंगिला याने सकाळी आपल्या सोशल मिडिया हँडलवर पोस्ट करुन यासंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कॉमेडियन श्याम रंगिला याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी येथून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. श्याम रंगिला याने सकाळी आपल्या सोशल मिडिया हँडलवर पोस्ट करुन यासंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. वाराणसी येथून त्याला अद्याप उमेदवारी अर्ज मिळू शकलेला नाही. त्याने सर्व प्रकारचे प्रयत्न करुन सुद्धा त्याला उमेदवारी अर्ज मिळत नसल्याची तक्रार त्याने केली आहे.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून लोकसभा निवडणूक लढवण्याची श्याम रंगिलाने तयारी केली आहे. याच मतदारसंघातून पंतप्रधान मोदी तिसऱ्यांना लोकसभा लढवत आहेत. श्याम रंगिलाने दावा केलाय की, सर्व प्रयत्न करून सुद्धा त्याला उमेदवारी अर्ज देण्यात आला नाही. त्याने डीएम ऑफिसला फोन केला. रिटर्निंग ऑफिसरला फोन केला. पण, त्याला कोठूनही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. तो अद्याप उमेदवारी अर्जासाठी वाट पाहतोय.

एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओत तो म्हणालाय की, 'मी सकाळपासून येथे पोहोचलो आहे. मी सगळी कागदपत्रं आणली आहेत. पण, त्यांनी माझा अर्ज स्वीकारला नाही. माझा किमान अर्ज तरी त्यांनी स्वीकारावा. त्यानंतर त्यांना वाटलं तर तो रद्द करावा.'

व्हिडिओमध्ये दिसतंय की, श्याम रंगिला तिथे उपस्थित पोलिसांना विचारतो की, त्याला उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. त्यावर पोलीस उत्तर देतो की, सध्या अधिकारी आतमध्ये नाहीत. एक वरिष्ठ अधिकारी रंगिलाला सांगतो की, त्याने दुपारी बाराच्या नंतर यावं.

श्याम रंगिला डीएम ऑफिसमधील कोणा एका व्यक्तीला बोलताना दिसत आहे. रंगिला म्हणतो की, तो काल देखील आला होता. पण, त्याला रांगेत थांबावे लागले. जेव्हा त्याची वेळ आली तेव्हा गेट बंद करण्यात आले. यावर पुढील व्यक्ती त्याला सांगतो की, हे प्रकरण रिटर्निंग ऑफिसर आणि त्यांच्या टीमचे आहे. डीएम ऑफिसचे यात काम नाही. असं म्हणत फोन कट केला जातो.

श्याम रंगिला याच्या दाव्यानुसार, त्याने निवडणूक आयोगाकडे देखील याची तक्रार केली आहे. पण, त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. वाराणसी येथे १ जून रोजी म्हणजे शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT