Common Cancer Myths and Misconceptions
Common Cancer Myths and Misconceptions 
देश

World Cancer Day : 'हे' गैरसमज असतील तर लगेच दूर करा...

सकाळन्यूजनेटवर्क

कर्करोग कसा सुरू होतो आणि पसरतो, याविषयी काही चुकीच्या गोष्टी
आजही समाजात ऐकायला मिळतात. आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त
कर्करोगाबाबत काही चूकीच्या धारणांना जाणून घेत त्याबद्दल जागृकता
निर्माण करुयात.

साखर खाल्ल्याने कर्करोग आणखी तीव्र होतो? 

- नाही. संशोधनानुसार असे दिसून आले आहे की कर्करोगाच्या पेशी सामान्य
पेशींपेक्षा जास्त प्रमाणात साखर (ग्लूकोज) शोषून घेतात, परंतू कोणत्याही
अभ्यासात असे दिसून आलेले नाही की, साखर खाणे आपल्या कर्करोगाला
तीव्र करेल किंवा जर आपण साखर खाणे बंद केले तर आपला कर्करोग कमी
होईल किंवा संपेल. तसेच, अति-साखरेचा आहार वजन वाढविण्यासाठी
योगदान देऊ शकतो आणि लठ्ठपणा विविध प्रकारच्या कर्करोगाचे जंतू
विकसित होण्याला पुरक ठरतो. 

कर्करोग संक्रमक आहे? 

- सर्वसाधारणपणे तरी नाही. कर्करोग संक्रमणाने होणारा रोग नाही, जो
सहजपणे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरेल. कर्करोग एका
व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एकमात्र परिस्थितीमध्ये पसरु शकतो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कर्करोगाचे जंतू आहेत किंवा कधीकाळी त्या व्यक्तीस कर्करोग होऊन तो बरा झाला होता, अशी व्यक्तीचे अवयवदान किंवा टिशु प्रत्यारोपण केले गेले असेल. प्रत्यारोपण केले गेलेल्या शरीरात भविष्यात प्रत्यारोपण संबंधित कर्करोग विकसित होण्याची शक्यता वाढते. एखाद्या व्यक्तीचा कर्करोग बरा झाला असेल, त्यानंतर त्याने अवयवदान केले असेल, तर 10,000 कर्करोगींच्या मागे दोन प्रकरणे एवढे कर्करोग विकसित होण्याची शक्यता असलेले प्रमाण असते. तरी ज्यांचा कर्करोग बरा झाला आहे, त्यांनी अवयवदान करु नये असा सल्ला डॉक्टर देतात. 

रेडिएशन थेरेपी आपला जीव घेईल.

- रेडिएशन थेरपी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारी असू शकते, परंतु हा उपचार जीव वाचविणारा आहे. रेडिएशन थेरपीचा जास्त फायदा होण्यासाठी आणि रुग्णांना कमीतकमी त्रास व्हावा या उद्देशाने ही उपचार पध्दती अधिकाधिक सोपी करण्याचा प्रयत्न आणि संशोधन होत आहे. या उपचाराने होणारे काही दुष्परिणाम ग्राह्य धरलेच जातात, पण हे उपचार जीवासाठी धोकादायक नाही. रेडिएशनविषयी आपल्याला मनात कोणतीही भीती किंवा शंका असेल तर सर्वच उपचार नकारण्यापूर्वी आपण आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी. कारण शेवटी जीवन आणि मृत्यूचा प्रश्न आहे.

शस्त्रक्रियेमुळे कर्करोगाचा प्रसार होऊ शकतो.

- कर्करोग असलेल्या बऱ्याच लोकांना ट्यूमर काढून टाकण्यासाठी सर्जरी
सांगतात. शस्त्रक्रियेने कर्करोगाचा प्रसार होतो, याविषयी कोणतेही पुरावे
उपलब्ध नाहीत. 'सर्जिकल ट्यूमर रीझक्शन' (कर्करोगाचा ट्यूमर काढून
टाकणे) ही एक महत्वाचा आणि जीव वाचविणारा उपचार आहे. प्राथमिक
किंवा नॉन-मेटास्टेसाइज्ड ट्यूमर (जो ट्यूमर त्याच्या मूळ जागेपासून
पसरलेला नाही) शल्यक्रिया करुन काढून टाकणे, हे कर्करोगाचा प्रसार
शरीराच्या इतर भागांमध्ये पसरण्याल्या प्रतिबंध करते.

केसांचा डाय वापरल्याने कर्करोगाचा धोका वाढतो का?

- केसांचा डाय (केसांना करण्याचा कृत्रिम रंग) वापराने कर्करोगाचा धोका वाढतो, असा कोणताही ठोस पुरावा नाही. काही अभ्यासावरून असे सूचित होते की, हेअर ड्रेसर यांना नियमित हेअर डाय व इतर केमिकल हाताळत काम करावे लागते, त्यामुळे त्यांना मुत्राशयाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT