Narendra Modi Sakal
देश

तुमचा विजय देशासाठी प्रेरणादायी; राष्ट्रकुलमधील विजेत्यांशी पंतप्रधानांचा संवाद

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव समारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंशी संवाद साधला आहे. यावेळी जिंकलेल्या आणि सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी स्वागत केले आहे. भारतीय खेळाडू नव्या नव्या खेळात प्राविण्य मिळवत आहेत असं पंतप्रधान म्हणाले आहेत.

(PM Narendra Modi Speech)

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तब्बल ६१ पदकं मिळवली आहेत. त्यामध्ये भारताच्या मुलींनी आणि नव्या खेळाडूंनीही चांगले प्रदर्शन केलं आहे. हा तुमचा खेळ देशासाठी प्रेरणादायी आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले.

भारतीय खेळाडू हे कोणत्याही खेळासाठी तत्पर असतात, दरम्यान ज्या खेळाडूंचे थोडक्यात पदक हुकले त्यांनी भारताची माफी मागण्याची गरज नाहीये. तुम्ही देशासाठी विजेते आहात. फक्त तुम्ही आपला खेळ इमानदारीने खेळा. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय मुलींने रौप्यपदक जिंकले असून तुमचे हे यश भारतातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास मोदींना दिला आहे.

तुम्ही भारताला फक्त पदकं जिंकून दिलं नसून भारतीयांच्या मनातल्या भावनांना सदृढ केलं आहे. त्याचबरोबर खेळातीलच नाही तर इतर सेक्टरमधील युवकांना प्रेरणा देणारं तुमचं काम आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात हातभार लावला आहे. त्यांची जशी प्रेरणा आपणाला मिळते तशीच प्रेरणा भारतीय युवकांना तुमच्या विजयाने मिळणार आहे. असे गौरवाचे उद्गार मोदींना काढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

प्रेक्षकांना कसा वाटला 'मी कात टाकली'चा पहिला एपिसोड? नेटकरी म्हणतात- मुख्य नायिकेचे डोळे बघूनच...

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

Marathi News Live Updates: गणेश विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबाराचा प्रकार; संजय गायकवाड यांनी कारवाईची केली मागणी

Maharashtra Drought Relief : दुष्काळी मदतीसाठी 'ई-पीक पाहणी' ठरणार जाचक? अट शिथिल करण्याची गरज; राज्यात 35.37 टक्के गटांची पाहणी

SCROLL FOR NEXT