completely withdraw AFSPA act Prime Minister Narendra Modi sakal
देश

‘अफ्स्पा’ पूर्णपणे मागे घेऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘शांतता एकात्मता आणि विकास’ रॅलीमध्ये बोलत होते

सकाळ वृत्तसेवा

दिफू (आसाम) : गेल्या आठ वर्षांच्या काळामध्ये ईशान्येकडील राज्यांतील कायदा सुव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली असून या भागातील सशस्त्र दले विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) माघारी घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ते आज येथे आयोजित ‘शांतता एकात्मता आणि विकास’ रॅलीमध्ये बोलत होते. विविध राज्यांतील हिंसाचाराच्या घटना ७५ टक्क्यांनी घटल्या असल्यानेच हा कायदा लागू करण्याच्या पद्धतीमध्येही बदल करण्यात आला आहे. सर्वप्रथम त्रिपुरातून हा कायदा रद्द करण्यात आला आणि त्यानंतर मेघालयातून तो माघारी घेण्यात आल्याचे मोदींनी नमूद केले.

आसाममध्ये याआधी सत्तेवर असलेल्या सरकारने या कायद्याच्या अंमलबजावणीस तीन दशके मुदतवाढ दिली होती, तसेच त्यांच्या कार्यकाळामध्ये कायदा- सुव्यवस्थेच्या परिस्थितीतही सुधारणा झाली नव्हती असे मोदींनी सांगितले. मागील आठ वर्षांच्या काळामध्ये सत्तेवर योग्य नियंत्रण राहिल्याने अनेक राज्यांतून अफ्स्पा मागे घेण्यात आला. आता अन्य भागांतून देखील तो पूर्णपणे मागे घेतला जाईल. आजही नागालँड आणि मणिपूरच्या अनेक भागांमध्ये हा कायदा लागू असून तेथून देखील तो मागे घेण्यासाठी आम्ही वेगाने प्रयत्न करत आहोत असे मोदी म्हणाले. मोदी यांच्या हस्ते पशुवैद्यकीय कृषी महाविद्यालयाची पायाभरणी पार पडली. २ हजार ९८५ कोटी रुपयांच्या ‘अमृत सरोवर’ प्रकल्पाचीही सुरूवात करण्यात आली. कर्बी आंगलाँगमधील एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असे मोदींनी सांगितले.

विविध गटांबरोबर शांतता करार

आसामच्या कर्बी आंगलॉंग आणि त्रिपुरा या राज्यांतील काही गटांबरोबर आम्ही शांतता करार केले आहेत. याभागात स्थायी शांतता निर्माण होऊन या भागाचा वेगाने विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित प्रयत्न केल्याने ईशान्येकडील विकासाने वेग घेतला आहे.ही प्रक्रिया भविष्यामध्येही कायम राहील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

उपचार सामान्यांच्या आवाक्यात

पंतप्रधानांच्या हस्ते आसाममधील सात कर्करोग उपचार केंद्रांचे उद् घाटन यावेळी करण्यात आले. या केंद्रांमध्ये जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या केद्रांमुळे कर्करोगावरील उपचार सामान्यांच्या आवाक्यामध्ये येतील असा विश्वास ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केला. राज्यामध्ये सतरा कर्करोग उपचार केंद्रांचे नेटवर्क उभारले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

Pune Gas Leak: पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती; २४ नागरिकांना त्रास, मोठा अनर्थ टळला!

Pune Water: भामा-आसखेड धरणातून तिसरे आवर्तन सुरू; ५०% पेक्षा अधिक साठ्यामुळे शेतीला दिलासा!

SCROLL FOR NEXT