

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर कॉंग्रेस नेतृत्व नाराज असल्याची चर्चा होती. यावरुन महाविकास आघाडीत फूट पडणार आणि कॉंग्रेस आपला उमेदवार देणार असल्याची चर्चा होती, मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कॉंग्रेसने उमेदवार देणार नसल्याचे सांगितले आहे. यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.