CM Eknath Shinde esakal
देश

Congress Answer to Eknath Shinde: राहुल गांधींची सभा अन् शिवसेनेचा काळा दिवस; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर

भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानंतर रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात राहुल गांधींची जोरदार सभा झाली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानंतर रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात राहुल गांधींची जोरदार सभा झाली. या सभेला उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेसाठी हा काळा दिवस आहे, असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचा आता काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (congress answer to eknath shinde statement on rahul gandhi shivaji park rally as shiv senas black day)

थोरात म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लोकशाहीकडं बघण्याचा दृष्टीकोन काय आहे हे समजतं त्यांच्याविधानावरुन. ही लोकशाही आहे, त्यामुळं लोकसभेची महत्वाची निवडणूक सुरु झाली आहे तर त्याचा सभा घेणं एक महत्वाचा भाग आहे. लोकांशी संवाद करण्याला ते काळा दिवस म्हणतात, त्यामुळं त्यांनी अत्यंत दुर्देवी विधान केलेलं आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं होतं?

राहुल गांधींच्या सभेची काल जोरदार तयारी सुरु होती. या तयारीवरुन भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं. शिंदे म्हणाले की, आजचा दिवस हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे. कारण ज्या शिवतीर्थावरुन बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण देशाला मार्गदर्शन केलं त्याचं ऐतिहासिक मैदानात ज्यांनी सावरकरांवर आरोप केले त्यांच्यासोबत सभा घेण्याची वेळ आली आहे हे दुर्देवच आहे. आज गर्व से कहो हम हिंदू है हे कसं बोलणार? हा देखील प्रश्नच आहे. (Marathi Tajya Batmya)

हिंदुहृदयसम्राट बोलायला पण काही लोक घाबरत आहेत. त्यामुळं मला वाटतं की, बाळासाहेबांची विचारधारा सोडणाऱ्यांना जनता चांगलाच धडा शिकवेल. आमश्या पाडवींसारखे अनेक लोक बाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या विचारधारेच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळं आमच्याकडं बाळासाहेबांचे विचार आहेत तर तिकडं बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT