Ravishankar Prasad sakal
देश

Ravishankar Prasad : दक्षिण आणि उत्तर भारत असा विभाजनाचा काँग्रेसचा प्रयत्न

दक्षिण आणि उत्तर भारत असा देशाच्या विभाजनाचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करीत असल्याचा आरोप भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - दक्षिण आणि उत्तर भारत असा देशाच्या विभाजनाचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करीत असल्याचा आरोप भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. तेलंगणचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी बिहारच्या डीएनए संदर्भात केलेल्या वक्तव्याचा प्रसाद यांनी समाचार घेतला.दक्षिण आणि उत्तर भारत विभाजित होत असल्याचे विधान काँग्रेसच्या एका खासदाराने काही दिवसांपूर्वी केले होते.

‘स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी काँग्रेस अजून किती खालचा स्तर गाठणार,’ असा सवाल प्रसाद यांनी उपस्थित केला. ‘‘क्षणिक लाभासाठी काँग्रेसने देशाच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय एकतेवर अशा प्रकारे प्रहार करू नये.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माचा अपमान केला होता, त्यावेळीही सोनिया गांधी आणि राहुल गांधी गप्प होते. आज जेव्हा देशाची एकता बाधित केली जात आहे, तेव्हाही त्यांनी मौन बाळगले आहे,’’ अशी ​टीका प्रसाद यांनी केली.

तेलंगणाच्या लोकांपेक्षा बिहारच्या लोकांचा डीएनए चांगला आहे, असे वक्तव्य तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केले होते. त्यावर प्रसाद यांनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT