Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Raghuram Rajan  esakal
देश

Raghuram Rajan : कोण म्हणतं राहुल गांधी 'पप्पू' आहेत, ते पप्पू नाहीत तर..; काय म्हणाले RBI चे माजी गव्हर्नर?

काँग्रेसची भारत जोडो यात्रा काही महिन्यांपासून सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारत जोडो यात्रेच्या मूल्यांसाठी ते राहुल गांधी यांच्यासोबत गेल्याचंही राजन म्हणाले.

Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) याचं नेतृत्व करत आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी राहुल गांधींबाबत मोठं वक्तव्य केलंय.

राजन म्हणाले, राहुल गांधींची 'पप्पू' प्रतिमा खूपच दुर्दैवी आहे. काँग्रेसचा हा खासदार 'पप्पू' नसून हुशार व्यक्ती आहे. रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान हे वक्तव्य केलंय.

राजन पुढं म्हणाले, 'मला वाटतं की राहुल गांधींची 'पप्पू' प्रतिमा दुर्दैवी आहे. त्यांच्याशी अनेक आघाड्यांवर संवाद साधण्यात मी जवळपास एक दशक घालवलं आहे. ते कोणत्याही अर्थानं मला 'पप्पू' वाटत नाहीत. राहुल एक हुशार, तरुण, जिज्ञासू व्यक्ती आहे.'

भारत जोडो यात्रेच्या मूल्यांसाठी ते राहुल गांधी यांच्यासोबत गेल्याचंही राजन म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्राच्या आर्थिक धोरणांवरही टीका केली. मी भारत जोडो यात्रेत सहभागी झालो. कारण, मी पदयात्रेच्या मूल्यांसाठी तिथं गेलो. मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT