Rahul Gandhi 
देश

'भारत जोडो’ यात्रेनंतर मित्रपक्ष, विरोधक आम्हाला हलक्यात घेऊ शकणार नाही : काँग्रेस

सकाळ डिजिटल टीम

कन्याकुमारी : 'भारत जोडो' यात्रेनंतर काँग्रेस पक्ष नवीन अवतारात येणार असून तो पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक आणि सक्रिय असेल. त्यामुळे मित्रपक्ष आणि विरोधक दोघेही काँग्रेसला हलक्यात घेऊ शकणार नाहीत, असं पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भारतीय जनता पक्षाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटलं. (Bharat Jodo Yatra news in Marathi)

'भारत जोडो' यात्रा काँग्रेसमध्ये नवचैतन्य भरणारी असल्याचे सांगून ते म्हणाले की, यामुळे पक्ष मजबूत होईल आणि पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल. रमेश पुढं म्हणाले की, १३७ वर्षांच्या इतिहासात काँग्रेसमध्ये अनेक वेळा परिवर्तन झाले आहे. आता हा प्रवास काँग्रेसला नव्या अवतारात आणणार आहे. काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक आणि सक्रिय होईल. त्यामुळे आमचे मित्रपक्ष आणि राजकीय विरोधक काँग्रेसला हलक्यात घेऊ शकणार नाहीत.

दरम्यान काँग्रेस देशातील सर्वात जुना पक्ष आहे. काँग्रेस सत्तेत नसलं तरी प्रत्येक भागात, प्रत्येक गावात पक्ष अस्तित्वात आहे. भाजपकडून हल्लाबोल यात्रा सुरू करण्यात आली आहे. मात्र भाजपकडून करण्यात येत असलेला हल्लाबोल हा अस्वस्थेतून असल्याचंही रमेश यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT