Congress
Congress 
देश

Loksabha 2019 : महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची यादी आज 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे आज (ता. 18) जाहीर होतील, असे कळते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव या दोन्ही विद्यमान खासदारांवर निवडणूक लढण्यासाठी श्रेष्ठींचा दबाव वाढला आहे. तर, पुण्यात उमेदवारीसाठी "जिंकून येण्याची क्षमता' हाच निकष लावला जाणार असल्याचे कळते. 

कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठक होणार असून, त्यानंतर महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे कळते. याआधी राज्यातील पाच उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडावयाच्या जागेचा तोडगा अद्यापही निघाला नसल्याचे कळते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने हातकणंगलेची जागा राजू शेट्टींना सोडल्यानंतर कॉंग्रेसकडून सांगली मतदारसंघ सोडला जाईल, असे सांगितले जात आहे. परंतु, कॉंग्रेसमध्ये यावरून मतभेद उफाळून आले आहेत. यामुळे सांगली गेल्यास पश्‍चिम महाराष्ट्रातून कॉंग्रेसचे अस्तित्व उरणार नाही, असे केंद्रातील नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राजू शेट्टींना द्यावयाच्या जागेबाबत केंद्रीय निवडणूक समितीमध्ये निर्णय अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दुसरीकडे, याच कारणामुळे पुण्यामध्येदेखील संजय काकडे यांच्या उमेदवारीला कॉंग्रेसमधून कडाडून विरोध होत आहे. आयात केलेल्या उमेदवाराऐवजी कॉंग्रेसचाच स्थानिक चेहरा द्यावा, अशी आग्रही मागणी आहे. परंतु, पक्षश्रेष्ठींनी "विनेबिलिटी'चा निकष पुढे केल्याचे कळते. याच कारणामुळे विद्यमान खासदारांनी निवडणूक लढवावी, यावर पक्षश्रेष्ठी ठाम असल्याचे कळते. अपवाद वगळता केरळ, आसाममधूनही विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात अशोक चव्हाण यांना नांदेडमधून, तर राजीव सातव यांना हिंगोलीतून लढावे लागेल, असे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT