Smriti Irani eSakal
देश

Smriti Irani : लोकशाही रक्षणाचे कॉंग्रेसचे दावे पोकळ; स्मृती इराणी यांचा हल्लाबोल

द्रमुककडून घटनेचा अवमान

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : ‘’घटनेचे संरक्षक म्हणून सर्वत्र मिरवणाऱ्या कॉंग्रेसचे दावे पोकळ आहेत. या पक्षाने राज्यघटनेचा अवमान करणाऱ्या द्रमुकशी आघाडी केली आहे, तर बंदी घातलेल्या पीएफआयची राजकीय शाखा एसडीपीआयचा केरळमध्ये पाठिंबा कसा काय घेतला?’ असा सवाल केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी केला. येत्या १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील लोकसभेसाठी मतदान होत असून त्यानिमित्त उत्तर चेन्नईतील भाजपचे उमेदवार आर.सी. पॉल कनगराज यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, अध्यात्मिक शक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यात मी आली आहे. हे राज्य आपल्या परंपरा, संस्कृतीसाठी विख्यात आहे. या कारणांमुळेच द्रमुकचे नेते सनातन धर्मावर हल्ले करत राहतात. द्रमुकचे नेते हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा देशात संतापाची लाट उसळते. पण आज ते भारतीय आणि भारतीयत्वाबद्दल बोलतात, तेव्हा देशासमोर त्यांचा खरा बेगडी चेहरा येतो. यावेळी इराणी यांनी कॉंग्रेसवरही टीका केली. त्या म्हणाल्या, ‘‘कॉंग्रेस पक्ष म्हणतो, आम्ही लोकशाहीचे संरक्षण करू शकतो. मात्र द्रमुकला सोबत घेऊन आपण लोकशाहीचे संरक्षण कसे करू शकाल? असा माझा प्रश्‍न आहे.

देशाच्या घटनेची विटंबना करणारा पक्ष म्हणून त्याची ओळख असताना त्यांना सोबत घेऊन लोकशाहीचे संरक्षण कसे करणार? १९८० च्या दशकाच्या शेवटी द्रविड पक्षाने हिंदी विरोधी आंदोलनाच्या काळात घटनेची विटंबना केली होती, हे विसरता येणार नाही. निवडणुकीनंतर देशात भडका उडेल, असे कॉंग्रेसला वाटते. मग लोकांना वाटते की कॉंग्रेस पक्षाचे निवडणुकीत प्रचंड नुकसान होऊनही एवढा अहंकार बाळगत असेल तर असा पक्ष देशाच्या लोकशाहीचे संरक्षण कसे करू शकेल? कॉंग्रेस पक्षाने केरळमध्ये बंदी असलेली दहशतवादी संघटना पीएफआयचा राजकीय पक्ष एसडीपीआयचा पाठिंबा घेतला आहे. त्यामुळे लोकांनी विचार करावा की, कॉंग्रेस पक्ष आणि विरोधकांची आघाडी ही दहशतवादी संघटनेच्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा घेत असेल तर ते देशाच्या लोकशाहीचे संरक्षण कसे करू शकेल? ’’ विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’ आघाडीने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, असेही आवाहन इराणी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT