Congress confused about Prashant Kishor
Congress confused about Prashant Kishor Congress confused about Prashant Kishor
देश

प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्यावरून काँग्रेसची कोंडी; बैठक निष्फळ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना पक्षात घेण्यावरून काँग्रेसची (Congress) कोंडी झाली आहे. सोमवारी झालेल्या काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये गेल्यास इतर पक्षांसोबत कोणत्याही प्रकारच्या निवडणूक करारापासून दूर राहावे लागेल, असे सोनिया गांधींनी स्थापन केलेल्या समितीने म्हटले आहे. (Congress confused about Prashant Kishor)

दुसरीकडे प्रशांत किशोर यांनी अधिकृतपणे स्वतःला IPAC पासून दूर केले आहे. परंतु, असे मानले जाते की संघटनेच्या निर्णयांवर त्यांची स्पष्ट छाप आहे. सोमवारी पार पडलेली काँग्रेसची (Congress) ही बैठक विशेष मानली जात होती. कारण, प्रशांत किशोर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश करणार की नाही हे ठरवले जाणार होते. मात्र, बैठकीतून काहीही निष्फळ झाले नाही.

पक्षप्रमुख सोनिया गांधींव्यतिरिक्त प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या प्रस्तावावर अहवाल सादर करणाऱ्या सात सदस्यीय समितीचे सदस्य बैठकीसाठी पक्षप्रमुखांच्या निवासस्थानी पोहोचले. समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम आणि ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अंबिका सोनी, जयराम रमेश, दिग्विजय सिंग आणि रणदीप सिंग सुरजेवाला आहेत. काँग्रेस (Congress) सरचिटणीस प्रियांका गांधी आणि ज्येष्ठ नेते एके अँटनी हेही बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्षांच्या १० जनपथ निवासस्थानी पोहोचले.

आतापर्यंत तीन बैठका

प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या काँग्रेस (Congress) नेतृत्वासोबत आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत. यावेळी काही वर्षांतील निवडणुकीतील पराभवांवर मंथन करताना पक्षाला पुनरुज्जीवित करण्याच्या त्यांच्या योजनेबद्दल तपशीलवार सादरीकरण केले आहे. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला टक्कर देणाऱ्या पक्षांशी त्यांचे संबंध असल्यामुळे काँग्रेसच्या दिग्गजांचा एक भाग निवडणूक रणनीतीकारांसोबत भागीदारी करण्यापासून सावध आहे.

स्वतःला पूर्णपणे काँग्रेसला समर्पित करावे

प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या प्रस्तावाचे मूल्यांकन करण्यासाठी सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) स्थापन केलेल्या विशेष टीमची इच्छा आहे की त्यांनी इतर सर्व राजकीय पक्षांपासून फारकत घ्यावी आणि स्वतःला पूर्णपणे काँग्रेसला समर्पित करावे. प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस आणि केसीआरच्या तेलंगणा राष्ट्र समितीसह प्रादेशिक शक्तींशी युती करण्याची सूचना केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT