pradesh assembly election 2022
pradesh assembly election 2022 esakal
देश

योगींना रोखण्यासाठी 'काँग्रेस'ची खेळी

बाळकृष्ण मधाळे

उत्तर प्रदेश : पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची (Assembly election) जोरदार तयारी काँग्रेसकडून केली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं एक स्क्रीनिंग कमिटी (congress screening committee) देखील स्थापन केलीय. या कमिटीचे अध्यक्षपद जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांना देण्यात आलंय, तर दीपेंद्र हुड्डा आणि वर्षा गायकवाड यांना देखील या समितीत सदस्य म्हणून स्थान दिलं गेलंय. शिवाय, काँग्रेसच्या प्रभारी महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi Vadra), यूपीचे प्रमुख अजय लल्लू, सीएलपी नेत्या आराधना मिश्रा मोना हेही या कमिटीचे सदस्य असणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी काँग्रेसकडून केली जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी काँग्रेसकडून केली जात आहे. यासाठी आता काँग्रेसनं उमेदवार निवडीची अर्ज प्रक्रियाही सुरू केलीय. या निवड प्रक्रियेव्दारे 25 सप्टेंबरपर्यंत बुढाना गेट काँग्रेस कार्यालयात अर्ज करता येणार आहे. मात्र, इच्छुक उमेदवारांना उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या नावे 11,000 रुपयांचा मसुदा देखील करावा लागणार आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या सूचनेनुसार व उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्या मार्गदर्शनानुसार, निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरु करण्यात आलीय. सध्या काँग्रेस निवडणुकीच्या मूडमध्ये असून कार्यकर्त्यांना नागरिकांच्या घरोघरी पोहोचून काँग्रेसच्या विकासकामाबाबत माहिती देण्याचं आवाहन केलं गेलंय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचेही काँग्रेस कमिटीने स्पष्ट केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS Live Score : चांगल्या सुरुवातीनंतर राहुल त्रिपाठी बाद, पण अभिषेक शर्मानं झळकावलं अर्धशतक; हैदराबादच्या 100 धावा पार

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

Pune Accident: दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन; पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा आहे मुलगा

SCROLL FOR NEXT