Congress Convention  esakal
देश

Congress Convention : भाजप अहंकाराच्या शिखरावर; खर्गेंचा अमित शाहांवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः छत्तीसगडच्या रायपूर येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून काँग्रेसचे दिग्गज नेते रायपूरमध्ये आहेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी माध्यमांशी बोलतांना भाजपवर निशाणा साधला आहे. २०२४मध्ये आम्हांला प्रतिस्पर्धी नाही, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं होतं. त्याला खर्गेंनी जशास तसं उत्तर दिलं आहे.

अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या घटनेत पाच मोठ्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. या पाच दुरुस्त्यांमध्ये आरक्षण, सदस्यत्व, एआयसीसी मेंबर, सीडब्ल्यूसी आणि संघटनेशी संबंधीत नियम बदलले आहेत. या माध्यमातून काँग्रेसने मोठी राजकीय खेळी केल्याचं बोललं जात आहे.

अमित शाहांच्या २०२४च्या विधानावर मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, भाजपच्या या आव्हानाचं आम्ही स्वागत करतो. लोकविरोधी असलेल्या भाजपपासून सुटका मिळवण्यासाठी समविचार पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी आम्ही तयार असल्याचं ते म्हणाले.

 CWCची निवडणूक होणार नाही

आता CWC अर्थात काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये २३+2 सदस्यांऐवजी ३५ सदस्य असतील. यामध्ये ५० टक्के पदं ही एसटी, एससी, ओबीसी, युवक, महिला यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात येतील. पंतप्रधान, माजी पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष, माजी अध्यक्ष, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य सीडब्ल्यूसीचे मेंबर असतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : पारंपारिक पोशाखात महिला, तरुण तरुणींनी काढली महाडमध्ये शोभा यात्रा

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT