Congress Government Minister Shivanand Patil esakal
देश

Congress Government : कर्जमाफीसाठीच शेतकऱ्यांना राज्यात दुष्काळ हवा असतो; मंत्री पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य

शेतकऱ्यांचे (Farmers) कर्ज माफ व्हावे म्हणून राज्यात वारंवार दुष्काळ पडावा, अशी शेतकऱ्यांची इच्छा असते.

सकाळ डिजिटल टीम

मंत्र्यांच्या वक्तव्याला ‘बेजबाबदार’ म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर जोरदार निशाणा साधला.

बंगळूर : शेतकऱ्यांचे (Farmers) कर्ज माफ व्हावे म्हणून राज्यात वारंवार दुष्काळ पडावा, अशी शेतकऱ्यांची इच्छा असते, असे साखर व कृषी पणन मंत्री शिवानंद पाटील (Shivanand Patil) यांनी विधान केल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. सोमवारी विरोधकांनी हा शेतकऱ्यांचा अपमान असून, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

या वक्तव्यावर काँग्रेस सरकारवर (Congress Government) जोरदार टीका करत भाजपने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. बेळगाव येथे रविवारी एका कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले होते की, ‘‘कृष्णा नदीचे पाणी मोफत मिळते. वीज फुकट मिळते. मुख्यमंत्र्यांनी बियाणे आणि खतही मोफत दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अशी इच्छा होईल की, पुन्हा दुष्काळ पडावा, कारण त्यांमुळे आपले कर्ज माफ होईल. तुम्ही अशी इच्छा करू नका, तुमची इच्छा नसली तरी तीन-चार वर्षांतून एकदा दुष्काळ पडेल.’’

मृतांच्या वारसांची नुकसानभरपाईची रक्कम दोन लाखांवरून पाच लाख रुपये केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याचे वादग्रस्त विधान पाटील यांनी सप्टेंबरमध्ये केले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा ते वादात सापडले आहेत. राज्यात सर्वात भीषण दुष्काळ पडला आहे आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आधीच मध्यम मुदतीच्या कर्जावरील व्याज माफ करण्याची घोषणा केली आहे. शेतकरी संकटात असताना सरकार त्यांच्या मदतीला धावून येईल, परंतु कोणत्याही प्रशासनासाठी हे नेहमीच करणे कठीण आहे.

मंत्र्यांच्या वक्तव्याला ‘बेजबाबदार’ म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर जोरदार निशाणा साधला. पाटील यांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर उध्दट भाष्य केले होते. त्याची आठवण करून देत ते म्हणाले, ‘‘शिवानंद पाटील यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, त्यांना तातडीने बोलावून त्यांचा राजीनामा घ्यावा.’’

येथे पत्रकारांशी बोलताना विजयेंद्र म्हणाले की, देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात काँग्रेस आणि त्यांच्या सरकारची ही वृत्ती दुर्दैवी असून भाजप त्याचा तीव्र निषेध करत आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी पाटील यांच्यावर अशी विधाने करून शेतकरी आणि शेती संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप केला असून ते एका मिनिटासाठीही मंत्रिपदी राहण्यास योग्य नाहीत, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT