Mahant Narendra Giri Team eSakal
देश

महंत नरेंद्र गिरींची केंद्रीय नेत्यांच्या सांगण्यावरुन हत्या - काँग्रेस

शिवसेना आणि आपने सुद्धा त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सुधीर काकडे

आपल्या वक्तव्यांमुळे देशभरात चर्चेत राहणारे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri) यांचा सोमवारी संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह अल्लापूरमधील बांघबरी गद्दी मठाच्या एका खोलित लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. संशयास्पद मृत्यूनंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र आता काँग्रेसने महंत रामदास यांचा खून झाल्याचा आरोप केला आहे.

महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जाता आहेत. महंत नरेंद्र गिरी यांची हत्या झाली असून, काही केंद्रीय नेत्यांच्या सांगण्यावरुनच ही हत्या झाली आहे असा आरोप मध्यप्रदेशचे माजी मंत्री सज्जन वर्मा यांनी आरोप केला आहे. तसेच आम आदमी आणि शिवसेनेने सुद्धा त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तर, अखिलेश यादव यांनी देखील महंत नरेंद्र गिरी यांच्या हत्येची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत व्हावा आणि निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र सिंह यांनी केली आहे.

महाराष्ट्रात जमावाच्या मारहाणीत साधूचा मृत्यू झाला. तेव्हा देशभरातून आवाज उठला. नरेंद्र गिरींच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं तेव्हा उत्तर प्रदेशात हिंदूत्वाचा गळा घोटला. त्यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी. ते आत्महत्या करतील असं वाटत नाही. याची कारणं शोधण्याची गरज आहे. आणि ती कोणी शोधायची हे ठरवायला हवं. अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. कोणतीही हिंदुत्वाचा गळा घोटतंय असं मला क्षणभर वाटलं असं राऊतांनी म्हटलं.

माध्यमांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी, "महंत नरेंद्र गिरी यांच्या अवेळी जाण्याने सर्वांनाच दु:ख झाले. कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नका.” असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी गळफास घेत आत्महत्त्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT