Navjot Singh Sidhu Team eSakal
देश

काँग्रेस हायकमांडनं फेटाळला सिद्धूंचा राजीनामा

काही वेळापुर्वीच कॅबीनेट मंत्री रझिया सुल्तान यांनी राजीनामा दिला.

सुधीर काकडे

पंजाब काँग्रेससाठी आजचा दिवस मोठ्या कसोटीचा ठरला. आज दुपारी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिल्लीकडे कुच करताच वेगवेळ्या चर्चांना सुरूवात झाली. ते काँग्रेस सोडणार असा अंदाज वर्चवला जात असतानाच, सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी अचानक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली. सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्याला सुरुवात झाली आणि अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. मात्र आता काँग्रेस हाय कमांडने सिद्धू यांचा राजीनामा फेटाळल्याचे वृत्त समोर आले आहे.

काँग्रेस हायकमांडने नवजोत सिंग सिद्धू यांच्या पदाचा राजीनामा फेटाळून लावला आहे. आज नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबमध्ये राजीनामा सत्राला सुरुवात झाली. काही वेळापुर्वीच काँग्रेस नेते गुलझार इंदर चहल आणि कॅबीनेट मंत्री रझिया सुल्तान यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच पंजाब काँग्रेसचे सरचिटणीस योगिंदर धिंग्रा यांनी राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का असल्याचे म्हटलं जात होतं. त्यानंतर आता नवज्योत सिंग सिद्धूंचा राजीनामा फेटाळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : दुष्काळसदृश परिस्थितीने सोयाबीन पिकाला फटका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मरडसगावात पिकांची केली पाहणी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT