अरुण शर्मा यांचा आम आदमी पक्षात प्रवेश sakal
देश

हिमाचलमध्ये काँग्रेसला धक्का; अरुण शर्मा यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

सरचिटणीस ‘आप’मध्ये; आणखी गळतीची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : गुजरातप्रमाणेच हिमाचल प्रदेशातही काँग्रेसला धक्का बसला आहे. सरचिटणीस अरुण शर्मा यांनी आम आदमी पक्षात (आप) प्रवेश केला. आणखी काही नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेसच्या हिमाचलमधील शाखेला गटबाजीने ग्रासल्याचा आणि त्यामुळे अनेक नेते निराश झाल्याचा दावा करीत शर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षात प्रवेश केला.

येथील आप मुख्यालयात त्यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, जेथे चार चालक वाहन चालवितात तेव्हा ते चार दिशांना भरकटते आणि मग अपघात होणे अटळ असते. तुम्ही पक्ष चालविण्याच्या बाबतीत असे करू शकत नाही. त्यामुळे गटबाजी सुरु झाली आहे. गट तयार करण्यासाठी प्रत्येक जण कुरघोडी करत आहे. प्रत्यक्षात पक्षाला काहीही फायदा होत नाही. त्यामुळे नुकसान होत आहे. याप्रसंगी इंटकचे कुलू जिल्हा सरचिटणीस संजय शर्मा यांनीही आपमध्ये प्रवेश केला. दिल्लीचे आरोग्य मंत्री आणि प्रभारी सत्येंदर जैन यांनी त्यांचे आपमध्ये स्वागत केले.

केजरीवाल यांच्या धोरणांमुळे हिमाचलमध्येच नव्हे तर देशात बदल घडत आहेत. आगामी निवडणुकांत जनमताचा कौल मिळेल आणि हा पक्ष सरकार स्थापन करेल.

- अरुण शर्मा, हिमाचलचे नेते

हिमाचलची जनता भाजप आणि काँग्रेसला कंटाळली आहे. आपला जनमत देण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.

- सत्येंदर जैन, आपचे प्रभारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Content Creator Earning: ₹60 हजारांच्या नोकरीला बाय-बाय! फक्त 14 हजार फॉलोअर्सवर महिन्याला कमावते ₹1.12 लाख

दुरुस्तीवेळी अचानक सुरू झाला बॉयलर, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; सुरक्षा साधनांच्या अभावामुळे दुर्घटनेचा नातेवाईकांचा आरोप

वडिलांच्या चपला घालण्यामागची भन्नाट गोष्ट, सोनाली बेंद्रेच्या ‘सोहळा’ची कथा काय?

Marathi News Live Updates: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी अडवला; राहुल गांधी बॅरिकेडवर चढल्याने आंदोलनाला वेगळे वळण

Video : वांद्रेत खळबळ! विजेच्या खांबावरून ८ फुटांच्या अजगराची सुटका, पाहा रेस्क्यूचा थरार

SCROLL FOR NEXT